इराक न्यायालयाचे ट्रम्प यांच्याविरोधात अटक वॉरंट

फोटो साभार एबीसी न्यूज

अमेरिकन संसदेत कॅपिटल सिटी हिंसाचारामुळे घेरले गेलेले अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसते आहे. इराकी न्यायालयाने डोनल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले असून इराकी कमांडर जनरल कासिम सुलेमानी व अबू माहदी अल मुहादिस याना ड्रोन हल्ल्यात ठार केल्याप्रकरणी ट्रम्प आणि पेंटागॉनचे कमांडर याना दोषी धरले आहे.

गतवर्षी इराकी जनरल कासिम सुलेमानी व अबू माहदी यांच्यावर विमानतळाबाहेर अमेरिकी ड्रोनने हल्ला केला होता त्यात हे दोघेही मरण पावले होते. विशेष म्हणजे इराणने सुद्धा ट्रम्प यांच्याविरोधात अटक वॉरंट अगोदरच जारी केले आहे. इराकी न्यायालयाने ट्रम्प यांना वरील हत्येप्रकरणी दोषी धरले आहे आणि हे अटक वॉरंट जारी केले आहे.

ट्रम्प यांच्या अटकेसाठी इराकने इंटरपोलची मदत मागितली आहे. ट्रम्प यांच्याबरोबर ४७ अमेरिकी अधिकाऱ्यांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली गेल्याचेही समजते. कमांडर सुलेमानी यांची हत्त्या करणाऱ्याला सरकार शिक्षा देईल असे प्रवक्ते गुलाम हुसेन इस्माईली यांनी म्हटले आहे. इराकने या प्रकरणी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात अपील केले असून त्यासंदर्भात १ हजार पानाचे चार्जशीट तयार करण्यात आले आहे असे समजते.