हे आहेत जगातील महागडे सिगरेट ब्रांड

फोटो साभार झी न्यूज

धुम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे, त्यामुळे आरोग्याचे नुकसान होते असा इशारा सिगारेटच्या पाकिटावर ठळक अक्षरात छापला जात असला तरी धूम्रपानाची मजा अनेकजण लुटत असतात असे दिसते. सिगारेटच्या किंमती कितीही वाढल्या आणि या कंपन्यांवर कितीही कर लावला तरी सिगारेटचा खप कमी झाल्याचे कधीच ऐकिवात येत नाही. सिगारेट शौकीन महागाईची पर्वा न करता धूर काढत राहतात आणि त्याला जगातील कोणताही देश अपवाद नाही.

माणसाला अनेक शौक असतात त्यात महागड्या सिगारेट ओढणे याचाही समावेश होतो. अश्या वेळी जगातील महाग सिगरेट ब्रांड कुठले असतील याची माहिती केवळ मनोरंजन म्हणून आमच्या वाचकांना देत आहोत.

जगातील सर्वात महागडा सिगरेट ब्रांड आहे इंग्लंड टोबॅको कंपनीचा ट्रेझरर ब्रांड. या सिगरेटचे एक पाकीट पडते ४५०० रुपयांना. म्हणजे एक सिगारेटसाठी साडेचारशे रुपये. या यादीत दोन नंबरवर आहे सर्वात जुना ब्रांड सोब्रानी. हा ब्रांड १८७९ मध्ये लाँच झाला असून या सिगारेटच्या एका पाकीटासाठी ८०० ते १२०० रुपये मोजावे लागतात.

या यादीत तीन नंबरवर स्वीस ब्रांड डेव्हिडऑफ चा नंबर लागतो. जगातील महागड्या ब्रांडपैकी असलेल्या या ब्रांडच्या एका पाकिटासाठी १ हजार रुपये मोजावे लागतात. चार नंबरवर असलेला ब्रांड पार्लमेंट हा जगभर प्रसिद्ध आहे. त्यांची तीन प्रकारची पॅकेट येतात आणि एका पाकिटासाठी ३५० ते ६०० रुपये अश्या त्यांच्या किंमती आहेत.

या यादीत पाच नंबर असलेला ब्रांड ऑस्ट्रियन ब्रांड आहे. त्याचे नाव आहे नॅट शर्मन. जगातील लग्झरी सिगरेट अशी ओळख असलेला हा ब्रांड १९३० मध्ये स्थापन झाला. याचा एका पाकीटासाठी मोजावे लागतात ७०० रुपये.