डूकाटी या वर्षात १२ नव्या मोटरबाईक भारतीय बाजारात आणणार

फोटो साभार पेहेल न्यूज

इटालियन लग्झरी मोटरसायकल ब्रांड डूकाटीने नवीन वर्षात म्हणजे २०२१ मध्ये भारतीय बाजारात विविध प्रकारची १२ मोटरसायकल मॉडेल्स लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. ही सर्व मॉडेल्स बीएस ६ मानकानुसार असतील, त्यात स्क्रँबलर आयकॉनच्या नव्याने अपडेट केलेल्या मॉडेलचाही समावेश आहे.

२०२० च्या अंतिम तिमाहीत  डूकाटीने कमी वेळात बीएस ६ मानाकांसह असलेल्या मोटरसायकल पेश केल्या होत्या. या सर्व बाईक सुपर मॉडेल सारख्या होत्या त्यात पेनिगल व्ही २, स्क्रँबलर ११०० प्रो, स्पोर्ट टूरर मल्टीस्ट्राडा ९५० एसचे नवे मॉडेल समाविष्ट होते. पैकी पेनिगलला भारतीय ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता असे डूकाटी इंडियाचे प्रमुख विपुल चंद्र यांनी सांगितले.

चंद्रा म्हणाले, नवीन मॉडेल टप्प्याटप्प्याने बाजारात आणली जातील. त्याची सुरवात २०२१च्या पहिल्या तिमाहीत बीएस ६ स्क्रँबलर, डायवेल, नवीन डायवेल एक्स लाँच करून केली जाईल. नंतर मल्टीस्ट्राडा व्ही ४, स्ट्रीटफायटर व्ही ४, पेनिगल व्ही ४ लाँच केल्या जातील. अंतिम तिमाहीत मॉन्स्टर, सुपरस्पोर्ट ९५० व हायपरमोटर्ड ९५० आरव्हीसी असतील. २०२१ चे वर्ष कंपनी साठी रोमांचक असेल असा विश्वास चंद्रा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.