भाजपचे दोन बडे नेते करणार शिवसेनेत प्रवेश !


नाशिक : शिवसेना आणि भाजपमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला नाशिकमध्ये सुरूवात झाली असून भाजपने शिवसेना नेते बाळासाहेब सानप यांना गळाला लावल्यानंतर शिवसेनाही आता आक्रमक झाली असून शिवसेनेने नाशिकमधील भाजपच्या दोन नेत्यांना गळाला लावले आहे. येत्या आठवड्याभरात वसंत गिते आणि सुनील बागूल हे भाजप नेते हातावर बांधणार शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बैठकांमध्ये भाजपने आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या जबाबदारीचे वाटप केले आहे. नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी आशिष शेलार यांना प्रभारी म्हणून नेमले आहे. आता आशिष शेलार यांच्यापूढे गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या दोघांमध्ये समतोल राखत पालिका निवडणुका जिंकून द्यायचे आव्हान आहे. तर इतर महापालिका निवडणुकांसाठी मुख्य जबाबदारी आणि प्रभारी यांचे वाटप भाजपने निश्चित करत निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे.