फायझरची कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर महिला डॉक्टरला मारला लकवा


मॅक्सिको सिटी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकडून जगभरातील लोकांना खूप अपेक्षा आहेत. कोरोनाचा प्रभाव या लसीमुळे कमी होईल अशी भावना सर्वसामान्यांना आहे. पण आता अशी बाब समोर आली आहे की, कोरोना प्रतिबंधक लसीमुळे नागरिक सुरक्षित नाहीत. कारण कोरोना लसीचे दुष्परिणाम होत असल्याचे आता दिसत आहेत.

फायझर कोरोना प्रतिबंधक लसीसंदर्भात एक गंभीर बाब मेक्सिको येथे समोर आली आहे. एक महिला डॉक्टरला ही लस घेतल्यानंतर लकवा मारला आहे. मेक्सिकोमध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतर अर्ध्या तासाने एका महिला डॉक्टरला त्रास होऊ लागला. व्हॅक्सीन घेतल्यानंतर तिला अतिशय थकवा जाणवू लागला. श्वास घ्यायला त्रास जाणवू लागल्यामुळे महिलेला रुग्णालयात आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले.

आरोग्य मंत्रालयाने या प्रकरणाबाबत म्हटले आहे की, डॉक्टर महिलेच्या डोक्याला आणि स्पाइनल कॉर्डमध्ये सूज आली आहे. यावर उपचार सुरू आहे. लस देण्याअगोदर डॉक्टर कार्ला यांना एंटीबायोटिकमुळे ऍलर्जी असल्यामुळेच त्यांना कोरोना लसीचा त्रास झाला आणि गंभीर दुखापत झाली. अर्धांगवायू झालेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी व्हॅक्सीनच्या दुष्परिणामाबाबत चिंता व्यक्त केली आहे. असा आग्रह त्यांनी धरला आहे की, या कोरोना प्रतिबंधक लसीची तपासणी व्हावी आणि याची चौकशी आरोग्य मंत्रालयाने करावी.

यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाचे असे म्हणणे आहे की, या गोष्टीवर आम्ही जोर देणार नाही की, डॉक्टर कार्ला यांना कोरोना प्रतिबंधक लसीमुळे लकवा मारला. या प्रकरणाची आम्ही चौकशी करू की याचा लसीशी काही संबंध आहे का? यामागचे खरे कारण जाणून घेण्यासाठी काही गोष्टी तपासाव्या लागतील.