जपानशी केंद्र सरकारने केलेला हा करार स्वागतार्ह पाऊल; रोहित पवार


मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारत आणि जपान यांच्यात झालेल्या कौशल्य हस्तांतरण कराराच्या पार्श्वभूमीवर प्रशंसा केली आहे. जपानशी केंद्र सरकारने केलेला हा करार स्वागतार्ह पाऊल असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. पण सर्व राज्यांना या करारातून उपलब्ध होणाऱ्या संधीचा समान लाभ मिळावा, अशी विनंतीही रोहित पवार यांनी नरेंद्र मोदी यांना केली आहे.


भारत आणि जपान यांच्यातील भागीदारी आणि सहकार्याला या करारामुळे संस्थात्मक चौकट प्राप्त होणार असल्यामुळे आवश्यक तंत्रज्ञान आणि जपानी भाषा अवगत असणाऱ्या भारतीय तरूणांना जपानमधील 14 विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. परिणामी भारतातील कुशल मनुष्यबळ जपानमध्ये पाठवणे सोपे होईल. पण देशातील प्रत्येक राज्यातील तरुणांना हे करताना समान संधी मिळावी, अशी माझी तुमच्याकडे विनंती असल्याचे रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदींना ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.