जनुकीय बदलाने चीनी सैनिक अधिक बलवान होणार?

फोटो साभार मिंट

अमेरिकन गुप्तचर संघटनेने चीन संदर्भात एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यानुसार चीनी वैज्ञानिक एखाद्या सायन्स फिक्शन प्रमाणे सैनिकांच्या डीएनए जीनोम मध्ये बदल करून त्यांना अधिक बलवान आणि मजबूत करण्याचे प्रयोग करत असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख जॉन रॅटाक्लिफ यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार चीन पीपल्स लिबरेशन आर्मी सैनिकांवर बायोलॉजीकल प्रयोग करत असून त्यांना सुपर ह्युमन बनवीत आहे. चीनचा उद्देश सर्व जगावर कब्जा मिळविणे हा आहे. दोन अमेरिकी संशोधकांनी गेल्या वर्षी केलेल्या रिसर्च मध्ये चीन बायोटेक्नोलॉजीचा वापर युध्द क्षेत्रात करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे सर्वसामान्य माणसालाही मजबूत बनविणे शक्य होणार आहे.

सैनिकांच्या डीएनए जीनोम मध्ये बदल केला तर त्यांच्या जखमा लवकर बऱ्या होतीलच पण न खातापिता हे सैनिक दीर्घकाळ लढू शकण्यास सक्षम बनतील. दुर्गम भागात हे अन्य सैनिकांच्या तुलनेत सहज लढू शकतील. याला क्रायस्पर तंत्रज्ञान म्हटले जाते. आत्ता पर्यंत या तंत्रज्ञानाचा वापर अनुवांशिक आजार आणि झाडांची झपाट्याने वाढ करण्यासाठी केला गेला आहे.