एलियन्स पृथ्वीवर फेकत आहेत कचरा?

फोटो साभार कॅच न्यूज

जगभरातील संशोधक पृथ्वीखेरीज अन्य कोठे जीवसृष्टी आहे का यावर दीर्घकाळ संशोधन करत असून त्यातूनच परग्रहवासी किंवा एलियन्सचे अस्तित्व यावर चर्चा सुरु असते. नुकतेच एका इस्त्रायली शास्त्रज्ञाने एलियन्स आहेत, त्यांचा अमेरिका आणि इस्रायलशी संपर्क आहे असे विधान करून खळबळ उडविली होती. त्यानंतर आता हॉवर्ड विद्यापीठातील अॅस्ट्रोलॉजी विभाग प्रोफेसर अवि लोएब यांनी एलियन्स आहेत आणि ते पृथ्वीवर कचरा फेकत आहेत असा दावा करून खळबळ उडविली आहे.

लोएब यांच्या म्हणण्यानुसार अंतराळातून पृथ्वीच्या दिशेने येत असलेले उल्कापिंड म्हणजे एलियन्सनी फेकलेला कचरा आहे. हे उल्कापिंड अन्य सर्वसामान्य उल्कापिंडांपेक्षा वेगळे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हे उल्कापिंड चमकदार खडकांचे असून असे खडक यापूर्वी कधीच पाहिले गेलेले नाहीत. हे उल्कापिंड म्हणजे अंतराळात दुसऱ्या ठिकाणी जीवन आहे याचा पुरावा आहे असा लोएब यांचा दावा आहे.

ते पुढे म्हणतात एलियन्सनी फेकलेल्या अश्या कचऱ्यामुळे अंतराळ भरून गेले आहे. एलियन्स पृथ्वीवर लक्ष ठेऊन आहेत आणि विमानासारख्या वस्तू पृथ्वी प्रदक्षिणा करून निघून जात आहेत. एलियन्स नी फेकलेल्या कचऱ्यातून म्हणजे उल्कापिंड खडकातून विचित्र प्रकाश बाहेर पडतो असाही दावा त्यांनी केला आहे.