वाशी मार्केटला रवाना देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी


देवगड – देवगड हापूस आंब्याच्या दोन पेट्या सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावातून वाशी मार्केटला रवाना झाल्या आहेत. दोन हापूस आंब्याच्या पेट्या मुंबई मार्केटला कुणकेश्वर गावातील आंबा बागायतदार शंकर नाणेरकर यांच्या आमराईतुन पाठविण्यात आल्या आहेत.

पहिली देवगड हापूस आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना करण्याचा मान यावर्षी शंकर नाणेरकर मिळवला असून काल आंब्याच्या पेट्या पाठवण्यात आल्या आहेत. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात शंकर नाणेरकर यांच्या कुणकेश्वर गावातील हापूस कलमांना मोहोर आला होता.

कलमांना आलेला मोहोर टिकवून मोहोरावर कीटकनाशकाच्या फवारण्या करून मोहोर टिकवण्यात त्यांना यश आले. आंबा बागायतदार शंकर नाणेरकर यांनी टिकवलेल्या मोहोरामुळे देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी मार्केट मध्ये पाठवता आली. यातून त्यांना चांगल्या दराची अपेक्षा आहे.