भारतात उद्या लाँच होणार MG Hector Facelift


नवी दिल्ली – सात जानेवारी अर्थात उद्या भारतात MG Motor India आपली नवीन 2021 MG Hector SUV फेसलिफ्ट लाँच करणार आहे. भारतात अनेक बदलांसह एमजी हेक्टर फेसलिफ्ट लाँच करण्यात येणार आहे. भारतात कंपनीने सर्वप्रथम एमजी हेक्टर ही एसयूव्ही लाँच केली होती. या पहिल्या इंटरनेट एसयूव्हीला भारतात ग्राहकांचा दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर कंपनी आता ही कार अपडेटेड व्हर्जनमध्ये लाँच करणार आहे. आधीपेक्षा जास्त बोल्ड आणि आक्रमक डिझाइनसोबतच इंटेरियरमध्येही काही बदल दिसतील.

काही अद्ययावत फीचर्सचा समावेश असणार आहे. यात ‘हिंग्लिश’ व्हॉइस कमांड्स हे ऑटो सेगमेंटमध्ये प्रथमच देण्यात येणार आहे. म्हणजेच यात इंग्लिशसोबत हिंदीत व्हॉइस कमांडची सुविधा मिळेल. तुम्ही कारमध्ये बसताच हिंदीत एफएम चलाओ, एसी का टेंपरेचर कम कर दो, इंग्लिश गाना बजाओ असे बोलल्यानंतर कार त्याला प्रतिसाद देईल. सिंगल टोन (ब्लॅक) इंटेरिअर, ड्युएल-टोन इंटेरिअर, ड्युएल टोन-एक्सटेरिअर अशा अनेक पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध असेल. 17-इंचाच्या अलॉय व्हील्सऐवजी 18-इंच अलॉय व्हील्स नवीन एसयूव्हीमध्ये मिळतील. ट्विन-5-स्पोक अलॉय व्हील्स एमजी हेक्टर फेसलिफ्टमध्ये असण्याची शक्यता आहे. तसेच या कारमध्ये वायरलेस चार्जिंग, फ्रंट व्हेंटिलेटेड सिट्स (फर्स्ट इन सेगमेंट), ड्युएल-टोन बेज आणि ब्लॅक इंटेरिअरचा पर्यायही उपलब्ध आहे.

1.5-लिटर पेट्रोल, 1.5-लिटर पेट्रोल हायब्रिड आणि 2.0-लिटर डिझेल इंजिन व्हेरिअंट्समध्ये नवीन एसयूव्ही लाँच होऊ शकते. 141 bhp पॉवर आणि 250 Nm पीक टॉर्क पेट्रोल आणि पेट्रोल-हायब्रिड इंजिन व्हेरिअंटमध्ये जनरेट होते. तर, डिझेल इंजिनमध्ये 168 bhp पॉवर आणि 350 Nm पीक टॉर्क जनरेट होते. एक नवीन टेल-लॅम्प जॉइनिंग सेक्शन आणि एक नवीन ‘हेक्टर’ लोगोसोबत एका रीफ्रेश रिअर प्रोफाइलसह हेक्टर येईल. हेक्टरची किंमत भारतात 12.84 लाख रुपये ते 18.09 लाख रुपयांदरम्यान (एक्स-शोरूम) असल्यामुळे नवीन हेक्टरची किंमत यापेक्षा थोडी जास्त असण्याची शक्यता आहे.