व्हॉट्सअॅप सुरु ठेवण्यासाठी करण्यासाठी कंपनीच्या अटी स्वीकारणे अनिवार्य


लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअॅपने आपली प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली असून व्हॉट्सअ‍ॅपची नवी पॉलिसी जे युजर्स स्वीकारणार नाहीत, त्यांना व्हॉट्सअॅपचा वापर करता येणार नाही. म्हणजेच तुम्हाला जर व्हॉट्सअॅपचा वापर करायचा असेल तर कंपनीच्या अटी स्वीकारणे अनिवार्य असेल.

व्हॉट्सअ‍ॅपबाबतचे सर्व अपडेट्स ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo ने गेल्या महिन्यातच नव्या पॉलिसीबाबतची माहिती दिली होती. व्हॉट्सअॅपची नवीन प्रायव्हसी पॉलिसी आता युजर्सना 8 फेब्रुवारी 2021 पर्यंत स्वीकारावी लागेल. एखाद्या युजरने जर नवीन पॉलिसी स्वीकारली नाही, तर त्याला व्हॉट्सअॅपचा वापर करता येणार नाही. व्हॉट्सअॅप ओपन केल्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर नवीन पॉलिसी दिसेल, तुम्हाला ही पॉलिसी स्वीकारण्यासाठी Accept Now पर्यायावर क्लिक करावे लागेल. थोड्या कालावधीसाठी पॉलिसी स्वीकारायच्या नसल्यास, तुम्ही ‘नॉट नाउ’ या पर्यायावरही क्लिक करु शकतात. पण या पॉलिसी स्वीकारण्यास नकार दिल्यास तुम्हाल व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही.

नववर्षात युजर्सच्या डेटाचा वापर कशाप्रकारे केला जाईल याची माहिती व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अटींमध्ये देण्यात आली आहे. तसेच, युजर्सचा चॅटिंग डेटा कशाप्रकारे स्टोअर आणि मॅनेज केला जातो, याशिवाय फेसबुक बिजनेससाठी तुमची चॅट कशाप्रकारे मॅनेज केली जाईल याबाबतही माहिती देण्यात आली आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामचे जास्त इंटीग्रेशन नव्या पॉलिसीमध्ये आहे. आता युजर्सचा आधीपेक्षा जास्त डेटा फेसबुककडे जाईल. व्हॉट्सअॅपचा डेटा आधीपासूनच फेसबुकला दिला जातो. पण आता फेसबुक आणि इस्टाग्रामवर इंटीग्रेशन जास्त होईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.