मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्स बजावले असून त्यांना 11 जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हे समन्स पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी बजावण्यात आले आहे. तत्पूर्वी ईडीकडून वर्षा राऊत यांची 4 जानेवारी रोजी तब्बल साडेतीन चार तास चौकशी करण्यात आली होती. तसेच 11 डिसेंबर रोजी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप रंगले.
पीएमबी बँक घोटाळा प्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीकडून समन्स
29 डिसेंबर रोजी वर्षा राऊत यांना हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले होते. पण चौकशीला हजर राहण्यासाठी त्यांनी मुदत वाढ मागितली होती. दरम्यान, ईडी विरुद्ध शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याची बातम्या सोशल मीडियामध्ये फिरत होत्या. या वृत्ताचे संजय राऊत यांनी खंडन केले असून बेकायदेशीर आणि राजकीय सूडाच्या कारवाईस कायदेशीर उत्तर देऊ असे ट्विट त्यांनी केले होते.
संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खात्यातून केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी वर्षा राऊत यांनी ईडीने समन्स बजावले आहे. HDIL च्या वाधवान बंधूंच्या पीएमसी बँक घोटाळ्याशी हे प्रकरण संबंधित आहेत. दरम्यान, मुंबईतील गोरेगाव येथे HDIL एका पुनर्विकास प्रकल्पाचे काम करत होते. पण त्यात गडबड आढळून आल्याने वाधवान बंधून अटक करण्यात आली. यापूर्वी या प्रकरणाचा तपास EOW करत होते. पण हे प्रकरण आता ईडीकडे सोपवण्यात आले आहे.