जगातील पहिल्या मालवाहतूक डबलडेकर ट्रेनला मोदी दाखविणार हिरवा कंदील

जगातील पहिल्या डबल स्टॅक लॉंगहॉल कंटेनर ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा कंदील दाखविणार असून ७ जानेवारीला सकाळी ११वा. डब्ल्यूडीएफसी म्हणजे वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देशाला समर्पित करणार आहेत. न्यू रेवडी- न्यू मदारखंड हा ३०६ किमी लांबीचा हा रेल मार्ग आहे. या रुट वर न्यू अटेली ते न्यू किशनगढ इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर चालणारी १.५ किलोमीटर लांबीची जगातील पहिली डबल स्टॅक लॉंगहॉल कंटेनर ट्रेन धावणार आहे. यावेळी रेल्वे मंत्री पियुष गोयल उपस्थित राहणार आहेत.

हा मार्ग हरियाना आणि राजस्थान राज्यातून जातो आणि त्यावर ९ स्टेशन आहेत. या ट्रेन नेहमीच्या मालवाहतूक करणाऱ्या ट्रेनच्या तुलनेत २५ टन अधिक लोड नेऊ शकतात. डीआरडीओच्या वॅगन विभागाने या गाड्यांचे डिझाईन केले आहे. या ट्रेन सध्याच्या ट्रेनच्या तुलनेत चौपट कंटेनर वाहून नेऊ शकणार आहेत. सध्याच्या मालवाहतूक गाड्या ताशी २६ किमी वेगाने धावतात तर नव्या स्टॅक लॉंगहॉल कंटेनर ट्रेन ताशी ७५ ते १०० किमी वेगाने मालवाहतूक करू शकणार आहेत असे सांगितले जात आहे.