२०७० मध्ये अशी असेल प्रवास व्यवस्था
फोटो साभार पत्रिका
इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील नामवंत कंपनी सॅमसंगने केएक्स ५० या नावाने जगातील मान्यवर ५ भविष्यवेत्त्याकडून २०७० पर्यंत जग कसे बनेल याचे विश्लेषण करून घेतले होते. त्यानुसार २०५० ते २०७० या काळात वाहतुकीची कोणती साधने असतील आणि किती वेगाने प्रवास होऊ शकेल याची मजेदार विश्लेषणे आली आहेत.
या विश्लेषणानुसार जग भूमिगत समुद्री हायवेजने जोडले जाईल आणि सीलबंद ट्यूब सिस्टीम समुद्राखालुन तयार होईल. यामुळे वेगाने तरंगणाऱ्या पॉडस मधून प्रवासी प्रवास करू शकतील. यामुळे युके ते युरोप हे अंतर केवळ १ तासात कापणे सहज शक्य होणार आहे.
या काळात हवाई टॅक्सी, बस, उच्च क्षमतेची ड्रोनकॉप्टर्स मधून प्रवासी येजा करतीलच पण अंतराळ पर्यटन सुद्धा सुरु होईल.नागरिक दीर्घ पल्ल्याच्या प्रवासी रॉकेट मधून पृथ्वीच्या वायूमंडळाबाहेर अंतराळातून प्रवास करू शकतील आणि हा प्रवास ताशी २० हजार मैल वेगाने होईल. म्हणजे लंडन ते न्युयॉर्क अंतर ३० मिनिटात कापता येईल.
या काळात एरियल स्पोर्ट सामने होतील आणि त्यासाठी हॉवर बोर्डचा वापर होऊ शकेल. लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढेल आणि परिणामी पर्यटक अंतराळातील लग्झरी हॉटेल्स मध्ये उतरून चंद्र व अन्य ग्रहांची प्रदक्षिणा करू शकतील. या हॉटेल मध्ये स्वतःचे गुरुत्वाकर्षण निर्माण करण्याची क्षमता असेल.