वॅक्सीन मॅन अदार पूनावाला यांची पत्नी नताशा

पुण्यातील सिरम संस्थेत तयार करण्यात आलेल्या कोविड १९ वरील कोविशिल्ड लसीचे निर्माते अदार पूनावाला यांची ओळख अब्जाधीश अशी आहेच पण त्यांना जग ओळखते ते वॅक्सीन मॅन नावाने. सध्या पूनावाला कुटुंब विशेष चर्चेत आहेच पण त्याचबरोबर अदार यांची पत्नी नताशा ही सुद्धा विशेष चर्चेत आली आहे. नताशा पूनावाला म्हणजे नक्की कोण याची अनेकांना माहिती नाही पण ही माहिती जाणून घेण्याची इच्छा मात्र आहे.

नताशा यांचे बॉलीवूड तारे ताराकांसोबतचे फोटो अनेकदा झळकले आहेत. बॉलीवूड मध्ये करीना, करिश्मा, सोनम पासून अनेक तारका त्यांच्या मैत्रिणी आहेत मात्र प्रत्यक्ष बॉलीवूडशी नताशा यांचा काहीही संबंध नाही. अर्थात बॉलीवूड सेलेब्रिटी इतक्याच त्याही लोकप्रिय आहेत. नताशा यांचे शिक्षण पुण्यात झाले आहे आणि त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकोनोमिक्स मध्ये पदवी घेतली आहे. अदार यांची नताशा यांची ओळख लंडन येथेच झाली होती.

या दोघांचा विवाह २००६ मध्ये झाला तेव्हा लग्नाला शरद पवार, विलासराव देशमुख असे अनेक राजकीय बडे नेते उपस्थित होते त्याचबरोबर अनेक उद्योजक, बॉलीवूड मधील तारे तारकासुद्धा उपस्थित होत्या. नताशा यांची आणखी एक ओळख फॅशनिस्ट अशीही आहे. जगभरातील अनेक नामवंत फॅशन शो मध्ये त्यांना सन्मानाने बोलाविले जाते.

अदार पूनावाला सिरम संस्थेचे सीईओ आहेत तर नताशा संस्थेच्या संचालक आहेत. अनेकदा बिझिनेस करार करताना त्या पतीला सल्ला देण्याचे काम करतात. करोना लस बनविण्याच्या प्रक्रियेत सुद्धा त्यांनी सल्ला दिलेला आहे. या जोडप्याला दोन मुले आहेत.