ऋतिक रोशनसोबत धूमच्या आगामी सिक्वेलमध्ये झळकू शकतो हा अभिनेता


‘धूम’च्या आगामी सिक्वेलबद्दल सिनेरसिकांमध्ये कमालीची उत्सुकता दाटली आहे. या चित्रपटाच्या आगामी सिक्वेलची 2013 पासून चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अ‍ॅक्शनने परिपूर्ण असलेल्या धूम चित्रपटाच्या प्रत्येक भागाला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले आहे. धूम 3 चित्रपटातून आपल्या अभिनयचा जबरदस्त जलवा आमिर खानने दाखवला होता. त्यावेळी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकुळ घालत अनेक रेकॉर्ड तोडले होते. धूम सीरीजमधील प्रत्येक चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

धूम-1 मध्ये जॉन अब्राहम आणि धूम-2 मध्ये हृतिक रोशन झळकले होते. आता धूम सीरीजच्या पुढील भागातही या दोन अॅक्शन हिरोंचे धमाकेदार सीन आपल्याला पाहायला मिळू शकतात. कारण या चित्रपटात पहिल्यांदाच जॉन अब्राहम आणि हृतिक रोशन दोघेही एकत्र दिसणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या दोघांच्या चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. या दोन्ही अॅक्शन हिरोंना एकत्र आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून यशराज फिल्म प्रयत्न करत होते. आता कुठे ते दोघे एकत्र येण्याची शक्यता आहे.

जर असे झाले तर हा चित्रपट अॅक्शन सीनच्या बाबतीत एक वेगळीच उंची गाठेल. त्याचबरोबर या चित्रपटात दीपिका पादुकोणही दिसणार आहे. लेडी व्हिलनची भूमिका साकारताना या चित्रपटात दीपिका पादुकोण दिसणार आहे. दीपिकाला नकारात्मक भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. दीपिकाने यापूर्वीही नकारात्मक भूमिका साकारली आहे. अक्षय कुमार सोबत ‘चांदनी चौक टू चायना’ या चित्रपटात ती याआधी नकारात्मक भूमिका साकारताना दिसली आहे. या चित्रपटात दीपिकाची दुहेरी भूमिका होती.