नव्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ; एकूण संख्या अठ्ठावन्नावर


पुणे: एकीकडे कोरोनाबाधितांच्या दैनंदिन संख्यावाढीला आळा बसत असल्याचे चित्र असतानाच ब्रिटनमध्ये प्रथम सापडलेल्या नव्या रूपांतरित कोरोना विषाणू बाधितांची संख्या वाढत आहे. मंगळवारी आणखी २० जणांना नव्या झाल्याचे येथील विषाणूविज्ञान संस्थेत करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये आढळून आले आहे. देशातील नव्या विषाणूबाधीतांची एकूण संख्या ५८ पोहोचली आहे.

नव्या कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी बाधितांचे कुटुंबीय, त्यांच्या बरोबर प्रवास केलेले लोक तसेच अन्य निकटवर्तीयांची माहिती मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अभियान हाती घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

नव्या कोरोनाबाधितांची संख्या ब्रिटनमध्ये वेगाने वाढत असल्याने ब्रिटनमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या शिवाय भारतासह डेन्मार्क,, नेदरलँड, आस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबनान आणि सिंगापुरमध्ये कित्येकांना नव्या विषाणूची बाधा झाली आहे.