करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमधील 30 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार गौतम अदानी!


2021 हे वर्ष करण जोहरसाठी फलदायी ठरताना दिसत आहे. बॉलिवूडमधील निर्मात्यांमध्ये करण जोहर हा अव्वलस्थानी असून करण 2021 मध्ये बिग बजेट असलेले बरेच चित्रपट घेऊन आपल्या भेटीला येणार आहे आणि त्याच्या या चित्रपटांमध्ये प्रसिध्द अभिनेते आणि अभिनेत्री काम करणार आहेत. करणला अशा परिस्थितीमध्ये प्रोजेक्ट्स सुरु करण्यासाठी खूप पैशांची गरज भासणार आहे. आता करण जोहरची ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी पुढे येत आहेत.

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये 30 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत गौतम अदानी आहेत आणि तशी चर्चा देखील सुरू झाल्याची माहिती बॉलिवूड हंगामाच्या सूत्रांनी दिली आहे. करण जोहरची कंपनी धर्मा प्रोडक्शन ही सर्वात मोठी आणि सर्वाधिक चित्रपट बनवते. रणवीर-आलिया आणि अमिताभ बच्चन यांचा आगामी ब्रह्मास्त्र हा चित्रपट अद्याप पूर्ण झाला नाही आणि त्याचे बजेट 300 कोटींच्यावर गेले आहे.

त्याव्यतिरिक्त जुग जुग जियो, शेरशाह, रणभूमि, दोस्ताना 2, तख्त ते सूर्यवंशी या मोठ्या बजेट चित्रपट यंदा रिलीज होऊ शकतात. गौतम अदानी भारतातील सर्वात यशस्वी उद्योगपतींपैकी एक आहेत. यूपीमध्ये त्यांनी 35 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. करणचा आणि गौतम अदानी यांच्यात हा करार जर झाला, तर अदानी करण मिळून बॉलिवूडमधील चित्र बदलू शकतात.