मागील २ महिन्यापासून बेपत्ता आहेत अलीबाबा समुहाचे मालक जॅक मा


बीजिंग – मागील दोन महिन्यांपासून चीनमधील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे अब्जाधीश आणि अलीबाबा समूहाचे मालक जॅक मा हे बेपत्ता असून चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी टेक वर्ल्डवर राज्य करणारे जॅक मा झालेल्या वादानंतर ते गेल्या दोन महिन्यांपासून कुठेही दिसले नाहीत. शांघाय येथे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या भाषणात चीनच्या ‘व्याजखोर’ आर्थिक नियामक आणि सरकारी बँकांवर जॅक मा यांनी कडक शब्दात टीका केली होती.

जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी एक आदर्श म्हणून काम करणाऱ्या जॅक मा यांनी सरकारला आवाहन केले होते की, नवीन गोष्टी व्यवसायात आणण्याच्या प्रयत्नांना दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रणालीत बदल करावा, जागतिक बँकिंग नियमांना ‘वृद्ध लोकांचा क्लब’ असे त्यांनी म्हटले होते. चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी जॅक मा यांच्या या भाषणानंतर संतापली होती, जॅक मा यांची टीका कम्युनिस्ट पक्षाच्या जिव्हारी लागल्यानंतर जॅक मा यांच्याभोवती संकटांची मालिका सुरु झाली, त्यांच्या अनेक व्यवसायावर विलक्षण निर्बंध लादले गेले.

जॅक मा यांना नोव्हेंबरमध्ये चिनी अधिकाऱ्यांनी जोरदार धक्का दिला, ३७ अब्ज डॉलर्सचा त्यांच्या अँट ग्रुपचा आयपीओ निलंबित केला. वॉल स्ट्रीट जनरलच्या अहवालानुसार थेट चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडून जॅक माच्या अँट ग्रुपचा आयपीओ रद्द करण्याचा आदेश आल्यानंतर ख्रिसमसच्या पूर्वसंध्येवेळी जॅक मा यांनी सांगितले की, तोपर्यंत चीनच्या मी बाहेर जाणार नाही जोपर्यंत अलीबाबा समूहाविरूद्ध सुरू असलेला तपास पूर्ण होत नाही.

जॅक मा त्यानंतर नोव्हेंबरमध्ये त्यांच्या टीव्ही शो ‘अफ्रीका बिझिनेस हिरोज’च्या फायनलपूर्वी रहस्यमयपणे गायब झाले. त्याचबरोबर या कार्यक्रमातून त्यांचे फोटोही काढून टाकण्यात आले. अलीबाबा समूहाचे प्रवक्ते म्हणाले की, जॅक मा आता वादामुळे जज पॅनेलच्या समितीचे सदस्य नाहीत. पण, शोच्या जॅक मा यांनी फायनलपूर्वी ट्विट केले की, सर्व स्पर्धकांना भेटायला ते थांबू शकत नाही. त्यानंतर त्यांच्या तीन ट्विटर खात्यांवरून कोणतीही पोस्ट केलेली नाही. पूर्वी ते सतत ट्विट करत असत.

जॅक मा चीनमध्ये आवाज दाबला जाणारा पहिली व्यक्ती नाही. कम्युनिस्ट पार्टी किंवा शी जिनपिंग सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या अनेक लोकांना देशात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. शी जिनपिंगवर यापूर्वी टीका करणारे उद्योगपती रेन झिकियांग बेपत्ता झाले होते. कोरोनाविरूद्ध योग्य पावले उचलली नसल्याने शी जिनपिंग यांच्यावर त्यांनी टीकास्त्र सोडले होते, यानंतर १८ वर्षासाठी त्यांना तुरूंगात टाकण्यात आले. तर आणखी एक चिनी अब्जाधीश झियान जिआन्हुआ २०१७ पासून नजरकैदेत आहे.