या दिवशी लॉन्च होणार FAU-G ; ‘असा’ कराल डाऊनलोड


भारतात काही कालावधीत प्रचंड लोकप्रिय झालेल्या PUBG गेमवर बंदी घातल्यानंतर गेमर्समध्ये मोठ्या प्रमाणात निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. पण त्याला पर्याय म्हणून PUBG च्या धर्तीवर अवघ्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने FAU-G गेमची घोषणा केली होती. तरुणांमध्ये FAU-G ची घोषणा झाल्यापासून या गेमची खूप उत्सुकता असून, याची आतुरतेने वाट पाहिली जात होती. ही प्रतिक्षा आता संपली असून, FAU-G २६ जानेवारी २०२१ रोजी लॉन्च केला जाणार आहे.

याविषयीची उत्सुकता FAU-G गेमच्या दमदार ट्रेलरमुळे आणखीनच वाढली आहे. गेमची घोषणा नोव्हेंबर २०२० मध्ये करण्यात आल्यानंतर त्याच्या प्री-रजिस्ट्रेशनसाठी सुरुवात झाली होती. पहिल्या २४ तासांत १० लाख जणांनी नोंदणी केली होती. FAU-G गेमची निर्मिती बंगळुरू येथील nCORE Games डेव्हलपर्स करणार आहेत.


आपल्या ट्विटर अकाउंटवर या गेमचे एंथम अक्षय कुमारने जारी केले आहे. त्याचसोबत गेमच्या प्री-रजिस्ट्रेशनची लिंकही फॅन्ससोबत अक्षय कुमारने शेअर केली आहे. या लिंकमार्फत युझर्स गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन करु शकतात. त्याचबरोबर अक्षय कुमारने यापूर्वीच पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला पाठिंबा म्हणून हा अॅक्शन गेम सादर करताना मला अतिशय अभिमान वाटत आहे. निडर आणि एकतेचे प्रतिक गार्ड्स – फौजी. या मोबाईल गेममधून मिळणाऱ्या महसुलाचा २० टक्के वाटा भारताच्या वीर ट्रस्टला दान केला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.

अशा प्रकारे डाऊनलोड कराल FAU-G?

  • FAU-G गेम लॉन्च झाल्यानंतर प्ले स्टोरवर उपलब्ध होईल.
  • हा गेम प्ले स्टोरसह ऑफिशिअल वेबसाइटवरूनही डाऊनलोड करता येणार आहे.
  • गेमचे प्रमोटर्स nCore गेम्स FAU-G गेमसंदर्भातील सर्व माहिती मार्फत देण्यात येत आहे.