अशा प्रकारे टेलिग्राम अॅपच्या माध्यमातून कराल ग्रुप व्हिडिओ कॉल


अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने आपल्यापासून दूर असलेल्या लोकांशी संपर्क साधता यावा, यासाठी अनेक नवनवीन फिचर्स, अॅप्स आणले. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे माणसे एकमेकांपासून दूरावली गेली, त्याचबरोबर एकमेकांना भेटणे देखील अवघड झालेले असतानाच आपल्यासमोर Zoom, Skype, Google Meet सारखे अनेक अॅप्स नवीन बदलासह आणण्यात आल्यामुळे ग्रुप कॉलिंग, ग्रुप व्हिडिओ कॉलिंग देखील अगदी सहज शक्य झाले. टेलिग्राम या इन्स्टंट मेसेजिंग अॅपमध्येही त्याचप्रमाणे काही बदल करण्यात आल्यामुळे त्याच्या माध्यमातून देखील ग्रुप कॉलिंग अगदी सहजसोपे झाले असेल.

पण हे ग्रुप कॉलिंग कसे करायचे आणि मोबाईलमध्ये काय सेटिंग करायची हे आपल्यापैकी अनेकांना माहिती असणे गरजेचे आहे. हे नवीन फिचर टेलिग्रामच्या बीटा व्हर्जनमध्ये रोलआउट केले गेले आहे. याचा अर्थ आता ग्रुप कॉल फीचर केवळ बीटा यूजर्सच वापरु शकतात. तुमच्या मोबाईलमध्ये त्यासाठी टेलिग्रामचे लेटेस्ट बीटा व्हर्जन असले पाहिजे. त्याचबरोबर टेलिग्रामच्या या ग्रुप कॉल फीचरमध्ये ‘Only admins can talk’ नावाची सुविधा मिळेल. या बॉक्सवर टीक केल्यानंतर केवळ कॉल करणाराच बोलू शकेल आणि इतर मेंबर्स केवळ ऐकतील.

अशा प्रकारे टेलिग्रामद्वारे कराल ग्रुप व्हिडिओ कॉल?

टेलिग्राम अॅप आपल्या स्मार्टफोनवर ओपन करा.

कोणत्याही ग्रुप चॅट विंडोवर जा आणि त्याच्या हेडरवर टॅप करा

तुम्हाला येथे ग्रुप मेंबर्स आणि नोटिफिकेशन सेटिंग्ससह ग्रुपशी संबंधित अन्य माहिती मिळेल

त्यानंतर वरच्या उजवीकडील कोप-यातील एका चिन्हावर टॅप करा आणि स्टार्ट व्हॉईस चॅट पर्यायावर क्लिक करा.

एक नवीन पॉप-अप विंडो आता तुम्हाला दिसेल. आपण जेथे त्या मेंबर्सला सिलेक्ट करु शकता, ज्यांना तुम्ही आपल्या ग्रुप कॉलमध्ये जोडू इच्छिता.