या राजकन्यांनी देखील केला आहे सर्वसामान्य माणसाशी विवाह


सध्या जपानची राजकन्या माको हिचा ‘कॉमन मॅन‘ असलेल्या केई कोमुरो याच्याही होत असलेला विवाह जगभरामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. जपानच्या शाही परिवाराच्या सूत्रांनी माहिती दिल्याप्रमाणे माको या सम्राट अकिहितो यांच्या पुत्री असून, इंटरनॅशनल क्रिश्चन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्याबरोबर शिकत असलेल्या केई कोमुरो यांच्याशी त्या विवाहबद्ध होणार आहेत. केई आम नागरिक असल्याने माको यांना शाही नियमांप्रमाणे , लग्नानंतर एक सर्वसाधारण नागरिक बनून राहावे लागणार आहे. केई हे टोक्यो येथील एका विधी कार्यालामध्ये नोकरीस आहेत. विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना दोघांची भेट होऊन त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. राजकुमारी माको या सध्या एका संग्रहालयामध्ये शोधकर्ता म्हणून काम करीत आहेत.

१९८० साली स्वीडनची राजकुमारी बनलेल्या व्हिक्टोरिया हिने ही २०१० साली सर्वसाधारण नागरिक असलेल्या डॅनियल वेस्लिंगशी विवाह केला. विवाहापूर्वी डॅनियल हे व्हिक्टोरियाचे पर्सनल ट्रेनर म्हणून कार्यरत होते. विवाहानंतर डॅनियल यांना आपल्या आडनावाचा त्याग करावा लागला असून विवाहापश्चात त्यांना ‘ड्यूक’ ची उपाधी देण्यात आली. व्हिक्टोरीयाचे पर्सनल ट्रेनर बनण्याआधी डॅनियल स्विस मिलीटरीमध्ये अधिकारी होते. स्वीडनच्या वर्तमान राजानंतर गादीवर येण्याऱ्या त्यांच्या वारसांमध्ये व्हिक्टोरिया यांचा चौथा नम्बर आहे.

स्वीडनच्या राजकुमारी व्हिक्टोरिया यांची धाकटी बहिण असलेल्या राजकुमारी मेडलाईन यांनीही एका सर्व साधारण नागरिकाला आपला जीवनसाथी बनविणे पसंत केले आहे. फायनान्स क्षेत्रात कार्यरत असलेल्या क्रिस्टोफर ओ नील यांच्याशी मेडलाईन विवाहबद्ध झाल्या आहेत. नील हे अद्यापि स्वीडनचे नागरिक बनायचे आहेत. स्वीडनचे नागरिकत्व मिळाल्यानंतरही नील सर्वसधारण नागरिक बनूनच राहणार असल्याचे शाही परिवाराच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

अल्बाच्या राजकुमारी डोना मारिया डेल रोसारियो यांनी ही आपल्या पहिल्या पतीच्या मृत्यनंतर एका सर्वसाधारण व्यक्ती असलेल्या अल्फान्जो डीयाझ यांच्याशी लग्न केले. त्यांचे हे दुसरे पती सर्वसाधारण नागरिक तर होतेच, शिवाय राजकुमारी डोना यांच्यापेक्षा वयाने तब्बल पंचवीस वर्षांनी लहानही होते. त्यामुळे अल्फान्जो यांनी संपत्तीच्या मोहाने डोना यांच्याशी विवाह केला असल्याची चर्चा होती, मात्र डोना यांच्या निधनानंतर अल्फान्जो यांनी सर्व संपत्ती आपल्या मुलांना देऊन टाकून, त्यातील एकही पैसा स्वतःसाठी ठेवला नाही.

युगान्डाच्या राजकुमारी रुथ कोमोन्तेले अमेरिकेमधील एका विद्यापीठात शिकत असताना त्यांची भेट क्रिस्टोफर थॉमस यांच्याशी झाली. क्रिस्टोफर हे त्याकाळी डीझनी चॅनल मध्ये अकाउंटन्ट म्हणून नोकरी करीत होते. त्यांच्या लग्नाला युगांडाच्या शाही परिवाराकडून पुष्कळ विरोध सहन करावा लागला. पण कालांतराने शाही परिवाराने या विवाहाला मान्यता दिली आणि त्यानंतर २०१२ मध्ये हा विवाह संपन्न झाला.

मोनॅकोच्या राजकुमारी स्टेफनी यांनी ही २००३ साली पुर्तगाली ट्रपीझ आर्टिस्ट एड लोपेझ यांच्याशी विवाह केला. मात्र हा विवाह फार काळ टिकला नाही आणि एका वर्षाच्या अवधीतच दोघांनी घटस्फोट घेतला.

Leave a Comment