गोंदणाने कर्करोग


ऑस्ट्रेलियातल्या काही डॉक्टरांना कर्करोगाचा असा एक रुग्ण आढळला की ज्याला गोंदण केल्यानंतर १५ वर्षांनी त्या गोंदणातल्या काही रसायनांमुळे कर्करोग झाला आहे. गोंदणातली काही रसायने कर्करोगकारक आहेत हे आता अनेकांना माहीत झाले आहे म्हणून टॅटू करताना म्हणजे गोंदण करताना सावध राहण्याच्या सूचना सतत दिल्या जात आहेत. पण गोंदणानंतर १५ वर्षांनी त्या रसायनांचा असा परिणाम होऊ शकतो हे बघून ऑस्ट्रेलियातले डॉक्टर आचंबित झाले आहेत. या प्रकाराने या विषयावर चर्चा सुरू झाली आणि एका डॉक्टरांनी नवी माहिती देऊन सर्वांना आचंबित केले. त्यांनी एका रुग्णाला गोंदण केल्यानंतर ३० वर्षांनी कर्करोग झाल्याचे सांगितले. १५ वर्षांनंतर कर्करोग झालेला रुग्ण ही महिला आहे.

ही महिला तिच्या बगलेत काही लहान लहान गाठी झाल्या असल्याची तक्रार घेऊन आली. तिला या गुठळ्याचा त्रास १५ दिवसांपासून होत होता. तसा तिला फार काही त्रास नव्हता. ताप येत नव्हता, वजन कमी होत नव्हते, रात्री घाम येत नव्हता. ही सारी कर्करोगाची लक्षणे मानली जातात त्यामुळे आपल्या काखेत आलेल्या छोठ्या गाठी या कर्करोगाच्या असतील अशी तिलाही शंका आली नाही आणि डॉक्टरांनी तिची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांनाही तसे वाटले नाही. पण त्यांनी तिच्या बगलेत्या गाठीपैकी काही गाठी काढून त्या तपासल्या तेव्हा त्या अनैसर्गिकरित्या मोठ्या झालेल्या आढळल्या. अशी वाढ हे कर्करोगाचे लक्षण मानले जाते पण ही वाढ नेहमीच्या कर्करोेगाच्या पेशींमुळे झालेली नव्हती तर ती एका रसायनामुळे झाली होती.

म्हणून डॉक्टरांनी या रसायनांचा छडा लावण्याचे ठरवले आणि तसा तपास केला तेव्हा त्यांना हे रसायन गोंदणातले असल्याचे लक्षात आले. हे रसायन १५ वर्षांपासून हळुहळु झिरपत होते. त्वचेच्या आतील काही ग्रंथी त्वचेच्या संपर्कात येणार्‍या द्रव्यांना गाळून आत पाठवतात पण या गाळणीतून हे रसायन निसटले होते आणि आतपर्यंत पोचले होते. ते फार मंद गतीने आत पोचून आत परिणाम करीत होते. ही प्रक्रिया काही रुग्णांत तर यापेक्षा मंद असते. म्हणून एका महिलेला गोंदण केल्यानंतर ३० वर्षांनी कर्करोग झाला होता. हा रोग लिंफोमा म्हणून ओळखला जातो. ऑस्ट्रेलियात आढळलेल्या रुग्ण महिलेच्या पाठीवर गोंदण होते आणि त्यातले हे रसायन तिला तापदायक ठरले होते. अर्थात असा प्रसंग फार कमी प्रमाणात घडतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment