पगारातील ४० टक्के रक्कम समाजसेवेवर खर्च करतात शिवदीप लांडे


अपराध्यांचा कर्दनकाळ म्हणून अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांची ओळख असून मुळचे अकोल्यातील एका गरीब कुटुंबात लांडे यांचा जन्म झाला. पण आता त्यांच्याबाबत एक महत्वपूर्ण माहिती समोर आली असून शिवदीप लांडे हे आपल्या पगारातील जवळपास ४० टक्के रक्कम समाजसेवेवर करतात असे फायनान्शिअल एक्स्प्रेस या वृत्तपत्राने म्हटले आहे. दरम्यान लांडे हे लग्नापूर्वी आपल्या पगारातील अर्ध्याहून अधिक रक्कम समाजसेवेसाठी खर्च करायचे पण लग्नानंतर त्यांच्यावर वाढलेल्या आर्थिक जबाबदारीमुळे आता शक्य होईल तेवढे पैसे समाजसेवेवर खर्च करतात.

बिहारमध्ये शिवदीप लांडे यांची एक वेगळी ओळख आहे. २००६ च्या आयपीएस बॅचचे शिवदीप लांडे हे अधिकारी असून शिवदीप लांडे यांनी आयपीएस झाल्यावर महाराष्ट्रऐवजी बिहार कॅडर निवडला आणि ते बिहार पोलीस दलात रुजू झाले. बिहारमध्ये रुजू झाल्यावर कमी काळातच त्यांनी त्यांच्या कामाने छाप पाडली. लांडे यांनी बिहारमधील गावगुंडांवर धडक कारवाई करत त्यावर चाप लावला. शिवदीप लांडे हे राज्यातील जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे जावई आहेत.

Leave a Comment