शास्त्रज्ञांना सापडला सर्वात आळशी देश


जगभरातील स्मार्टफोन धारकांच्या फोनवरील विशिष्ट डेटा गोळा करून शास्त्रज्ञांनी एका सर्वेक्षणाच्या आधाराने मोठा विचित्र शोध लावला आहे. एका मोठ्या स्तरावर केल्या गेलेल्या या सर्वेक्षणाच्या आधारे जगभरातील ७००,००० लोकांच्या स्मार्टफोनवरील दिवसभरामध्ये केल्या गेलेल्या शारीरिक हालचालींची नोंद ठेवणारा डेटा गोळा करण्यात आला. या मागचे कारण अगदी साधे पण विचित्र होते. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या सर्वांना, ते दररोज किती पावले चालतात याची नोंद ठेवावयास सांगितले.

आपण किती पावले चालतो हे पाहण्यासाठी ‘ आर्गस ‘ नावाचे अॅप वापरण्यात आले. ह्या अॅप च्या द्वारे आपली दिवसभरातील शारीरिक हालचाल किती होते आहे याची नोंद ठेवणे शक्य होते. या अॅप द्वारे शास्त्रज्ञांकडे ही माहिती उपलब्ध झाली. ही माहिती निरनिराळ्या देशांमधील लोकांशी निगडीत होती. ह्या माहितीच्या द्वारे काही गोष्टी शास्त्रज्ञांना अगदी प्रकर्षाने जाणाविल्या. शास्त्रज्ञांनी या माहितीच्या आधारे असे निदान काढले की जगभरामध्ये लोक सरासरी ४,९६१ पावले दररोज चालतात. अर्थात हे आकडा सर्व लोकांना लागू नव्हता. गावोगावी, देशो देशी ही संख्या वेगळी होती. लोक रहात असलेले प्रदेश, तिथली जीवनशैली, त्यांचा एकंदर फिटनेस या वर ही संख्या अवलंबून होती. या मध्ये सरासरी पेक्षाही अगदी कमी शारीरिक हालचाल, इंडोनेशिया मधल्या लोकांची आहे असे निदान या सर्वेक्षणातून केले गेले. इंडोनेशियामधील लोक सरासरी ३,५१३ पावले दररोज चालतात असे दिसून आले.

सर्वात जास्त ‘अॅक्टिव्ह’ देश चायना असल्याचे या सर्वेक्षणाद्वारे स्पष्ट झाले. विशेषतः हॉन्गकॉन्ग येथे राहणार लोक सर्वात जास्त अॅक्टिव्ह असल्याचे निदान झाले. हे लोक दिवसभरात सरासरी ६,८८० पावले चालत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याविरुद्ध इंडोनेशिया ह्या देशातील लोक, हा देश निसर्ग सौंदर्याने नटलेला असला तरी सर्वात आळशी असल्याचे या सर्वेक्षणाद्वारे सिद्ध झाले आहे. चायना पाठोपाठ अनुक्रमे जपान, इंग्लंड, अमेरिका, युनायटेड अरब एमिरेट्स, आणि ब्राझील या देशांमधील लोक अॅक्टिव्ह असल्याचे समजते. ह्या सर्वेक्षणातून समोर आलेली माहिती ‘ नेचर ‘ या मासिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Leave a Comment