ही आहेत जगातील सर्वोत्तम घड्याळे


इंग्रजीमध्ये एक म्हण आहे. टाईम इज मनी.याचा अर्थ वेळेइतके महत्त्वाचे कांही नाही. किंवा वेळ हीच मौल्यवान वस्तू. मात्र जगात अशीही कांही घड्याळे आहेत ज्यांच्याबाबत टाईम इज मनी असे वेगळ्या अर्थाने म्हणता येते. या घड्याळ्यांच्या किमती लाखो रूपयांत आहेत. कांही घड्याळे तर इतकी महाग आहेत की त्याच्या किंमतीत एखादे घर किंवा किंमती कार सहज खरेदी करता येईल. अशाच कांही घड्याळांची ही माहिती.

स्पॅनिश टेनिसपटू राफेल नदाल याच्यासाठी खास डिझाईन केलेले हे घड्याळ हायटेक घड्याळ आहे. २०१४ साली ते लाँच केले गेले मात्र त्याचे फक्त १० पीसच तयार केले गेले होते. या घड्याळाची किंमत आहे १५ लाख पौंड


जर्मन वॉचमेकर कंपनीने तयार केलेले हे घड्याळ १८ कॅरेट गोल्ड मध्ये आहे. याचे ८७६ छोटे छोटे सुटे भाग हाताने बनविले जातात. कंपनी वर्षाला अशी फक्त सहा घड्याळे बनविते. याची किंमत आहे १५ लाख पौंड.


२००७ सालच्या लिलावात या १९५७ सालच्या पेटेक फिलिपी वॉच ला १५ लाख पौंड किंमत मिळाली होती. हे घड्याळ म्हणजे एक आश्चर्य मानले जाते.


हुरेस युनिव्हर्सलचे हे घड्याळ १८ कॅरेट गोल्डमध्ये बनविले गेले असून त्याचे डिझाईन १९३० साली लुईस केटोर याने केले होते. या प्रकारचे हे एकच घड्याळ असून त्याचीही किंमत १५ लाख पौंड आहे.


पेटेक फिलिपी कर्नोग्राफचे हे घड्याळ २०१३ सालच्या लिलावात ११ लाख पौंडाला विकले गेले. या डिझाईनची केवळ तीनच घड्याळे आहेत.


स्विझर्लंडमधील एका खासगी संग्रहालयात फोटो असलेले हे पायलट वॉच अतिशय दुर्मिळ आहे.२००९ साली करण्यात आलेल्या लिलावात त्याला १२ लाख पौंड किंमत मिळाली.


कुणालाही पाहता क्षणी प्रेमात पाडेल असे हे घड्याळ ५८ कॅरेटचे ४८० हिरे जडविलेले असून त्याची किंमत साडेबारा लाख पौंड आहे. हे घड्याळ वॉटरप्रूफ असून ते हातात असताना बिनधास्त स्विमिंगही करता येते.


१९२५ साली बनविलेले हे एकमेव ग्रेगन वॉच २००६ सालच्या लिलावात १३ लाख पौंडांना विकले गेले आहे.


रिचर्ड माईलवॉच हे घड्याळ स्टेटस सिंबल म्हणून वापरले जाते. सर्वसामान्य या घड्याळाला स्पर्श करण्याचाही विचार करू शकत नाहीत. कारण एकतर ते क्रिस्टल पासून बनविले गेले आहे आणि त्याची किंमत आहे १३ लाख पौंड.


१९४४ साली बनविले गेलेले पेटेक फिलिपी मॉडेलचे जगातले तिसरे महाग घड्याळ स्टेनलेस स्टीलपासून बनविले गेले असून या अनोख्या घड्याळाची किंमत आहे १३ लाख पौंड

Leave a Comment