लक्षावधी निरपराधांचा जीव घेणारे क्रूरकर्मे शासक


फार पूर्वीच्या काळापासून केवळ एका इशार्‍यावर रक्ताच्या नद्यांचे पाट वाहविणारे क्रूर कर्मे राजे, नेते जगात होऊन गेले आहेत. त्यातील कोणी साम्राज्यविस्ताराच्या भुकेने, कोणी रक्त पाहायला आवडते म्हणून, कुणी धर्मांधतेतून तर कुणी शुद्ध रक्त वंशासाठी प्रसिद्ध होते आणि आपले हेतू पूर्ण करण्यासाठी त्यांनी अक्षरशः लाखो जीवांना यमसदनी पाठविले. अर्थात त्यातील कांही इतके चांगले योद्धे होते की त्यांच्यापुढे कुणी टिकू शकले नाही.तर कांही हुकुमशहा होते व त्यांच्या सेनेच्या माध्यमातून त्यांनी निरपराधांचे हत्याकांड केले.त्यातील कांहीची ही माहिती.

चंगेझखान- हा मंगोलियन महान योद्धा होता. सर्व आशियात त्याला हरविणारा कोणी नव्हता मात्र दिल्लीत त्या काळी असलेल्या सुल्तान इत्सुशमिशपुढे मात्र त्याचे कांही चालू शकले नाही व त्याला पराभव पत्करावा लागला. त्याने लाखो लोकांना ठार केले. त्याचे खरे नांव होते तेमुजिन. त्याने मंगोल साम्राज्याचा पाया घातला व जगातील २२ टक्के भागावर कब्जा केला होता. त्याला चंगेझखान हे नाव समुद्राचा राजा या अर्थाने मिळाले होते.


तैमूरलंग- हा लंगडा होता आणि तो राजवंशात जन्माला आलेला नव्हता तर त्याने लढवय्यांची सेना उभारली आणि भारतासह दक्षिण, पश्चिम, मध्य आशियात तलवारीच्या जोरावर साम्राज्य उभे केले. त्याने दिल्लीवर चढविलेला हल्ला हा इतिहासात रक्तरंजित अक्षरांनी कोरला गेला कारण एकाच दिवसांत त्याने लाखो लोकांचे प्राण घेतले व यमुनेत अक्षरशः रकताचे पाट वाहविले होते.


सीझर- रोमचा हा शासक. तो स्वतःला ईश्वर समजत असे.ज्यांनी कोणी त्याला विरोध केला त्यांना त्याने ठार केले. रोमचा विकास त्याच्यामुळेच झाला पण अखेरी त्याच्या डोक्यात बिघाड होऊन तो आजारी पडला. गुन्हेगारांना तो सिंहाच्या पिजर्‍यात टाकत असे व त्यांची जीभ कापत असे त्यामुळे गुन्हेगार ओरडू शकत नसत. त्याच्या चार वर्षाच्या सत्तेत त्यानेही लक्षावधी माणसे ठार केली. त्याच्यावर एक हॉलीवूड चित्रपटही बनला होता मात्र त्यातील क्रूरतेमुळे या चित्रपटावर अनेक देशांनी बंदी घातली.


हिटलर- जर्मनीचा हा हुकुमशहा शुद्ध रक्ताच्या आर्य वंशाचा सिद्धांत घेऊन जगला आणि मेला. जर्मनीवर त्याचा इतका प्रभाव होता की तो जे म्हणेल त्याला लोक माना डोलवत असत. त्याने नाझी सैन्य उभे केले आणि या लोकांनी लाखो ज्यू वंशीयांची कत्तल केली. रासायनिक हत्यारांचा वापर, बंदुकीच्या गोळ्या आणि छळछावण्या उभारून त्याने कित्येक ज्यूंना मरणाच्या दारात ढकलले व तडफडून त्यांना मरणास सामोरे जावे लागले. त्याच्या या कृतीतून लहान मुलेही सुटली नाहीत.आजही जगात हिटलर या नावाची चांगलीच दहशत आहे.


रोबेस पियरे- फ्रान्स क्रांतीच्या काळात देशात विरोधकांच्या सामुहिक हत्या करणारा पियरे १८ व्या शतकात होऊन गेला. तो वास्तविक कमी जगला पण तेवढ्या काळातच लाखोंच्या प्राणांची आहुती त्याने घेतली. हा क्रूरकर्मा जेव्हा संतप्त व त्याच्या त्रासाने वैतागलेल्या प्रजेच्या हाती सापडला तेव्हा त्याचे डोके गिलोटीनखाली सत्वर उडविले गेले.


ड्रॅकुला- भयानक चेहरा, मोठे दात आणि माणसाच्या मानेत ते दात खूपसून रक्त पिणारा ड्रॅकुला आपण भयचित्रपटातून पाहिला आहे. माणसाचे रक्त पिणारा सैतान अशी त्याची ओळख. मात्र या चित्रपटाची प्रेरणा निर्मात्याला मिळाली ती ब्लड ड्रॅकुला या नावाने ओळखला जाणार्‍या वेलेंसियाच्या राजकुमारावरून. तो माणसांचे रक्त पित नसे पण लोकांचे रक्त वाहताना पाहणे हा त्याचा छंद होता. घोड्यांच्या टापांखाली चेचून तो लोकांना ठार करत असे. जगातला सर्वात मोठा खुनी अशीही त्याची ओळख आहे. वेलेंसिया मधले २० टक्के लोक म्हणजे १ लाख लोकांना त्याने यातना देऊन ठार केले.१४७६ साली जेव्हा तो मेला तेव्हा प्रजेने अक्षरशः सुटकेचा निश्वास टाकला.

Leave a Comment