रावणाने सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा, नक्की मिळेल प्रमोशन


आजकाल आफिसमधील कामामध्येही तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागते. आपण थोडे कुठे मागे पडतोय असे वाटते न वाटते तोच दुसरा कुणीतरी आपले प्रमोशन घेतो याचा अनुभव अनेकांना येत असेल. ऑफिसमधील कामात तप्तर राहायचे, प्रमोशनही वेळेवर मिळवायचे असेल तसेच स्वतःचा व्यवसाय असेल व त्यात यशस्वी व्हायचे असेल तर रावणाचे तीन सल्ले जरूर अजमावून पहा. आजच्या जीवनातही त्रेतायुगात रावणाने लक्ष्मणाला दिलेले सल्ले अगदी फिट बसताहेत हे आपल्या अनुभवास येईल.

रावण हा अतिशय ज्ञानी, विद्वान व पंडित होता हे आपण जाणतो. आपल्यालाच काय रामालाही रावणाच्या विद्वतेची पूर्ण कल्पना होती म्हणूनच जेव्हा रावण बाण लागून रणांगणात पडला तेव्हा रामाने लक्ष्मणाला नीती, राजनिती व शकती यांचा महान पंडित हे जग सोडून चालला आहे तेव्हा तू त्याच्याकडून कांही शिकून घे असे सांगितले होते. इतकेच नव्हे तर रावणाच्या डोक्याच्या बाजूला नको तर पायाच्या बाजूला उभे रहा असेही राम म्हणाला होता कारण ज्ञान घेणार्‍याने पायाकडेच उभे राहायचे असते. लक्ष्मणाला रावणाने तीन सल्ले त्यावेळी दिले.


त्यातील पहिला असा शुभस्य शीघ्रम. म्हणजे शुभ कार्याला उशीर नको व अशुभ कार्याला जेवढे टाळता येईल तितके टाळा. रावण म्हणाला, मी रामाला ओळखण्यात उशीर केला त्याला शरण जाण्यास उशीर केला त्याचे फळ मी भोगतो आहे. यातून असा अर्थ काढता येतो, कार्यालयात कामे करताना स्वतः बरोबर बाकी सहकार्‍यांचेही भले होईल अशी कामे प्रथम करा. त्यातून तुम्ही सहकार्‍यांना जवळचे व्हाल.

शत्रूला छोटे मानू नका असेही रावण म्हणाला. तो म्हणाला मानव, माकडे व अस्वले यांना मी तुच्छ मानत होतो व त्यामुळे ब्रह्माकडून जेव्हा अमरपदाचा वर मागितला तेव्हा माणूस व वानर सोडून कुणाकडूनही मला मरण येता कामा नये असे मागितले. मात्र माझा पराभव मानव व वानरांनीच केला. याचा अर्थ आपणही आपल्या प्रतिस्पर्ध्याला कधीही तुच्छ किंवा छोटा मानता कामा नये. कुणालाही हरवायचे असेल तर ते आपल्या कामाने हरवा.

रावणाने तिसरा सल्ला दिला तो हा की कधीही कुणाला स्वतःचे खास गुपित सांगू नका. रावण म्हणाला माझा मृत्यू कसा होईल हे गुपित बिभिषणाला मी सांगितले व ती माझी आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. कोणत्याही ठिकाणी काम करताना आपले विक पॉईंट किंवा आपली गुपिते कुणालाही सांगू नका अन्यथा तुमच्या या विकपॉईंटचा फायदा बाकी जण घेतील व कोणतीही कामे करण्यास तुम्हाला भाग पाडतील. हे आजच्या जीवनातही खरे ठरताना आपण अनेकदा पाहतो.

Leave a Comment