या विमानतळावर होते सर्वाधिक चॉकलेट विक्री


विमानाच्या तिकीटांच्या किंमती आवाक्यात येऊ लागल्यानंतर तसेच कमी वेळात जास्त ठिकाणी हिंडता येण्याची सोय म्हणून आजकाल जगभरातच विमान प्रवाशांची संख्या वाढली आहे. पर्यायाने विमानतळांचा विकासही जोरात होत आहे. जगभरातील विविध विमानतळ कांही ना काही कारणाने प्रसिद्ध आहेत. कांही प्रचंड मोठे असल्याने, कांही ठिकाणची वास्तूरचना वेगळी व आकर्षक असल्याने, कांही अतिस्वच्छ, कांही तेथील सुविधांमुळे, कांही सुंदर म्हणून तर कांही सर्वाधिक उड्डाणे होणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. बेल्जियमच्या ब्रसेल्स मधला विमानतळ मात्र वेगळ्याच गोड कारणाने प्रसिद्ध आहे.

ब्रुसेल्सचा विमानतळही मोठा आहे, स्वच्छ आहे, येथेही चांगल्या सुविधा आहेत पण त्याची प्रसिद्धी आहे ती स्वादामुळे. म्हणजे येथे होत असलेल्या चॉकलेट विक्रीमुळे. या विमानतळावर जेवढी चॉकलेट विक्री होते, त्याला जगात तोड नाही. जगात चॉकलेट विक्री करणारी जेवढी ठिकाणे आहेत, म्हणजे मॉल्स, दुकाने, सुपरस्टोअर्स, ब्रँड स्टोअर्स आणि चॉकलेटची आऊटलेटस त्या सर्वाधिक चॉकलेट विक्री या विमानतळावर होते. येथे दरवर्षी सरासरी ८०० टन म्हणजे ८ लाख किलो चॉकलेट विकले जाते.


याचाचा अर्थ या विमानतळावर दररोज सरासरी २ टन चॉकलेट विकले जाते. आणखी एका गणितानुसर येथे येणारे प्रवासी प्रतिमिनिटाला दीड किलो चॉकलेट खरेदी करतात. वर्षाला येथे सरासरी ८ कोटी प्रवासी येतात याचाच दुसरा अर्थ असा की प्रत्येक प्रवासी येथे ४० ग्रॅम चॉकलेट खरेदी करतो. या विमानतळावर बेल्जियम चॉकलेट हाऊसचे प्रचंड मोठे दुकान आहे तर बाकीची छोटे कियोस्क आहेत. येथे सर्व फेमस ब्रँडस म्हणजे निहॉस,गुयनियान, गोडिवा या व अशा अन्य कंपन्यांची चॉकलेटस मिळतात. ही चॉकलेट शॉप विमानतळाच्या ड्यूटी फ्री एरियात आहेत.

बेल्जियम फक्त चॉकलेट विक्रीसाठी प्रसिद्ध नाही तर बेल्जियम लोक चॉकलेट खाण्यासाठीही प्रसिद्ध आहेत. दवर्षी येथे २.२० लाख टन चॉकलेट तयार होते. त्यातील बहुतेक निर्यात होते मात्र बेल्जियममधील प्रत्येक व्यक्ती वर्षाला सरासरी ८ किलो चॉकलेट फस्त करते. बेल्जियममध्ये फक्त* चॉकलेट विक्री करणारी दोन हजारापेक्षा जास्त स्टोअर्स आहेत.

Leave a Comment