गुन्हेगारांना स्वतःच गोळ्या घालतात हे राष्ट्रपती


जगात अनेक सणकी डोक्याचे नेते राज्य करत असल्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचतो. त्यात सर्वात प्रथम क्रमांक लागावा तो फिलिपिन्सचे राष्ट्रपती राड्रोगो दुतेर्ते यांचा. वास्तविक फिलिपिन्समध्ये २००६ पासून मृत्यूची शिक्षा संपविली गेली आहे. मात्र हे राष्ट्रपती गुन्हेगारांना जराही दयामाया न दाखविता स्वतःच गोळ्या घालून ठार करतात. त्यांचा हा निर्धार इतका पक्का आहे की स्वतःच्या मुलालाही तो दोषी ठरला तर गोळ्या घालणार असे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या मुलावर अमली पदार्थ सेवन व तस्करीचे आरोप झाले आहेत त्यावर त्यांनी हा निर्णय बोलून दाखविला आहे.

गुन्हेगारांविषयी अतिशय निष्ठूर असलेले दुतेर्ते दावानो या शहराचे २२ वर्षे महापौर होते. त्यानंतर त्यांनी ९ मे २०१६ रेाजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत विजय मिळविला व त्यांनी फिलिपिन्सच्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे ३० जून २०१६ रोजी स्वीकारली. ते म्हणतात अमली पदार्थ तस्करांसाठी मृत्यू हाच सर्वोत्तम पर्याय आहे. दावाओचे महापौर असताना त्या गावातून अमली पदार्थ तस्करीसह अन्य गुन्हेगारी पूर्णपणे नष्ट करण्याचे श्रेय त्यांना दिले गेले होते. त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी एका चिनी मुलीचे अपहरण करून तिच्यावर गँगरेप केल्यानंतर राष्ट्रपतींनी त्यांच्या तिन्ही रक्षकांना स्वतःच गोळ्या घालून ठार केले आहे.

Leave a Comment