खोट्या वाटणार्‍या या अगदी खर्‍या गोष्टी


अनेकदा आपल्याला अनेक गोष्टी ऐकल्या की त्या विचित्र वाटतात व त्या खोट्या असाव्यात असेही वाटते. मात्र अविश्वसनीय किवा विचित्र वाटणार्‍या कांही गोष्टी प्रत्यक्षात अगदी खर्‍या असतात. अशाच कांही गोष्टींची ही माहिती

आपल्याला कुणी ओळखीचे भेटले तर आपण चटकन नमस्कार म्हणतो किंवा आजकाल हस्तांदोलन केले जाते. आपल्याला असे वाटते की हस्तांदोलन करणे ही समोरच्या व्यक्तीप्रती आपुलकी दाखविणारी कृती आहे. मात्र प्रत्यक्षात त्यामागे दुसर्‍या व्यक्तीच्या हातात ईजा करू शकेल असे काही शस्त्र नाहीना हे तपासण्याची ती पद्धत आहे. हस्तांदोलन करताना हात जोरात हलविले जातात त्यामागेही बाहीमध्ये कांही शस्त्र लपवून आणले गेलेले नाही ना हे तपासणे असते. म्हणजे असे म्हणता येईल की अफझलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारण्याऐवजी हस्तांदोलन केले असते तर कदाचित महाराज त्याला वाघनखांनी जखमी करू शकले नसते.


रस्त्यावर बाहेर पडल्यावर प्रचंड संख्येने कार्स दिसतात. तुम्ही कधी बारकाईने पाहिले असेल तर लक्षात येईल की या वाहनांत सिल्व्हर रंगाच्या गाड्या अधिक असतात. अमेरिकेत तर सिल्व्हर रंगाच्या कार्सचे प्रमाण २५ टक्के आहे. त्यामागचे कारण असे की या रंगाच्या गाड्यांना कमी अपघात होतात असे आकडेवारी सांगते.


आपल्या जन्माच्यावेळी आपल्या डोळ्यांचा आकार जेवढा असतो, तो आयुष्यभर तेवढाच राहतो. मात्र नाक व कानाचा आकार मोठा होत जातो. नाक बंद करून गुंगुं असा आवाज काढता येत नाही. तसेच चार चौघात वायू सरणे म्हणजे गॅस पास होणे हे कितीही लाजीरवाणे वाटत असेल व त्यामुळे भोवतालच्यांना विचित्र वाटत असेल तरी वायू सरणे हे आरोग्यासाठी फार फायद्याचे असते. त्यामुळे हाय ब्लडप्रेशर नॉर्मलवर येण्यास मदत मिळते. च्यूईंगम खात असताना गॅसेस जादा पास होतात कारण त्यावेळी आपण अ्रधिक प्रमाणात हवा गिळत असतो.


झोपताना आपण जितक्या गार खोलीत झोपू तेवढी भयानक स्वप्ने जास्त पडतात. ज्यांचा आयक्यू जास्त असतो त्यांनाही खूप स्वप्ने पडतात.


मध हा असा एकच पदार्थ आहे ज्यात आपल्या शरीराला आवश्यक ती सारी तत्त्वे आहेत. ब्रिटनमध्ये गर्भवती महिलांना कुठेही मूत्रविसर्जन करण्याची परवानगी आहे. तसेच महिला पुरूषांच्या तुलनेत अधिक वेदना सहन करू शकतात.

Leave a Comment