अडगळीतल्या या वस्तू बनवू शकतात लक्षाधीश


अनेकदा आपल्या घरात कित्येक वस्तू अडगळीत पडलेल्या असतात. म्हणजे त्या वापरात नसतात, जुन्या झालेल्या असतात व त्यांची अवस्था धड ठेववत नाही व धड टाकवत नाही अशी झालेली असते. घर आवरण्यासाठी काढले तर अशा वस्तू भंगारात दिल्या जातात. मात्र तुम्हाला याची जाणीव आहे काय की अशा अडगळीत पडलेल्या अनेक छोट्या मोठ्या वस्तू आपल्याला लखपतीही बनवू शकतात.अर्थात त्यासाठी तशी नजर हवी आणि थोडी जागरूकताही. अशा कोणत्या वस्तू तुमच्या उपयोगी पडू शकतात त्याची ही माहिती


जुने मोबाईल- आजकाल स्मार्टफोनची दुनिया आहे व कित्येकांकडे एकापेक्षा अनेक फोन आहेत. पण तुम्हाला नोकिया ११०० मोबाईल आठवतोय? तुमच्या जुन्या सामानात असा फोन असेल तर तुम्ही हा सेट विकून नवा स्मार्टफोन खरेदी करू शकाल. या सेटला चांगली किमत मिळते. त्यामुळे जुने मोबाईल भंगारात टाकण्यापेक्षा त्यांची ऑनलाईन विक्री केली तर चांगल्या ऑफर मिळतात.


जुनी कॅलेंडर्स- कॅलेंडर हे नुसते तारखा व दिवस दाखविणारे नसते तर त्यात अनेकदा महत्त्वपूर्ण माहिती असते. पूर्वी अशी खास निमित्ताने कॅलेंडर्स काढली जायची. त्यातलीच कांही तुमच्याकडे असतील तर ती रद्दीत घालू नका. ही कॅलेंडर्सही चांगला पैसा मिळवून देतात. म्युझियम अगर लायब्ररीत अशी कॅलेंडर्स दिली तर ते चांगली किमत देतात.


जुनी आर्टवर्क- आपल्या घरात आपल्या आजोबा पणजोबांनी घेतलेली आर्टवर्क असतात. मग ती ब्रँडेड पेन असतील, क्लासिक पेटींग असतील, फॅशन अॅक्सेसरीज असतील अथवा त्यांना आलेली कांही खास गिफ्ट असतील. अशी आर्टवर्क रात्रीत आपल्याला श्रीमंत बनवू शकतात. त्यासाठी शॉपिंग साईटवर त्यांची माहिती फोटो दिले तर चांगल्या ऑफर्स मिळू शकतात.


जुनी पुस्तके- अनेक घरात परंपरागत पुस्तके साठविलेली असतात. त्यातील कांही काळानुरूप जुनी होतात. मात्र अशाच जुन्या पुस्तकांवर एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची सही असेल किंवा त्याच्याशी कोणत्यातरी महत्त्वाच्या घटनेचा संबंध असेल, पुस्तक दुर्मिळ असेल तर ती तुमच्यासाठी चांगलीच लॉटरी ठरू शकतात. त्यासाठी अँटिक साईटवर त्यांचे फोटो टाकले तर या साईट त्यांचे लिलाव करून तुम्हाला चांगली किंमत देऊ शकतात.

Leave a Comment