तब्बल एवढ्या कोटींचा टॅक्स भरतो कपिल शर्मा


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा यांने ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून कमालीची लोकप्रियता मिळवली असल्यामुळे आज लोकप्रिय सेलिब्रिटींमध्ये त्याचे नाव आवर्जुन घेतले जाते. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला कपिल आज महामूर संपत्तीचा मालक असून एका वर्षामध्ये तो जवळपास कोटयावधींच्या घरात आयकर भरतो.

आपल्या ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमातच कपिलने त्याच्या इनकम टॅक्सचा खुलासा केला आहे. तो एका वर्षात किती कोटींचा टॅक्स भरतो, हे त्याने कार्यक्रमादरम्यान सांगितले आहे. त्याने सांगितलेली रक्कम थक्क करणारी असून अनेकांना ही रक्कम ऐकून धक्काच बसला आहे. एका वर्षात तब्बल १५ कोटी रुपयांचा आयकर कपिल शर्मा भरतो. टॅक्स म्हणजेच कर देशाच्या विकासासाठी भरणे गरजेचे असल्यामुळे आपल्या देशाचा विकास होतो आणि या विकास कामात आपला हातभार लागतो, असे कपिलने यावेळी सांगितले. दरम्यान,अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने ’द कपिल शर्मा शो’च्या मंचावर हजेरी लावली होती. त्याने त्यावेळी तिच्याशी बोलत असताना त्याच्या आयकरविषयी भाष्य केले. ऐश्वर्यालाही त्याची ही रक्कम ऐकून धक्का बसला.