नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडर महागले


मुंबई – तेल मार्केटिंग कंपन्यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅसच्या किंमती वाढवून सर्वसामान्य जनतेला झटका दिला आहे. एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत डिसेंबर महिन्यात दोन वेळा वाढ करून 100 रूपयांनी किंमती वाढवल्या होत्या.

तेल कंपन्यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी विना अनुदानित 14.2 किलोग्रॅम सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ केलेली नसून दर 694 रूपयांवर स्थिर आहे. पण व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 17 रूपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे 1332 रूपयांना मिळणाऱ्या व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी आता 1349 रूपये मोजावे लागणार आहे. इंडियन ऑईलच्या म्हणण्यानुसार, एक जानेवारीला 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीमध्ये 1349 रूपये झाली आहे. मुंबईमध्ये 1280.50, कोलकातामध्ये 1410 रूपये, तर चेन्नईमध्ये कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत 1463.50 रूपयांवर पोहोचली आहे.