दीपिका पादुकोणने डिलीट केल्या सोशल मीडियावरील सर्व पोस्ट ?


बॉलीवूडप्रमाणेच सोशल मीडियावरही अभिनेत्री दीपिका पादुकोण कायम सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर जवळपास ५ कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या या अभिनेत्रीचे असल्यामुळे दीपिका कायम या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. पण दीपिकाने चाहत्यांना नव्या वर्षात एक धक्का दिला आहे. आपल्या सोशल मीडियावरील सगळ्या पोस्ट तिने डिलीट केल्या आहेत. पण असा अचानकपणे हा निर्णय दीपिकाने का घेतला असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

केवळ इन्स्टाग्रामच नव्हे तर ट्विटर आणि फेसबुक या सोशल मीडिया अॅपवरुनदेखील दीपिकाने तिच्या पोस्ट डिलीट केल्यामुळे तिच्या अकाऊंटवर सध्या कोणतीही पोस्ट दिसत नाही. विशेष म्हणजे दीपिकाने या पोस्ट डिलीट केल्या की अन्य कोणत्या तांत्रिक कारणामुळे तिच्या पोस्ट डिलीट झाल्या आहेत. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, सोशल मीडियावरील दीपिकाच्या पोस्ट जरी डिलीट झाल्या असल्या तरी सोशल मीडियावर तिचा पती अभिनेता रणवीर सिंग मात्र चांगलाच सक्रीय आहे. त्याने नव्या वर्षाच्या स्वागताचे अनेक फोटो शेअर केल्यामुळे या दोघांचा हा पब्लिसिटी स्टंट तर नाही ना असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे. दोन दिवसांपूर्वी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग रणथंभोरला गेले आहेत. आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि नीतू कपूरदेखील त्यांच्या सोबत आहेत.