यामुळे 1 जानेवारीच्या पुढे वाढू शकते फास्टॅगची डेडलाइन


नवी दिल्ली : 1 जानेवारीपर्यंत जर तुमच्या गाडीमध्ये फास्टॅग नाही लावण्यात आला आहे, तर घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. कारण याची डेडलाईन सरकारकडून वाढवली जाण्याची शक्यता आहे. देशातील कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना तुम्हाला एखादा टोल प्लाझा ओलांडावा लागणार असेल तर 1 जानेवारी 2020 पासून तुमच्या कारला फास्टॅगचे स्टिकर लावून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

देशातील सर्व टोल नाक्यांवर स्पर्शविरहित आणि डिजिटल पेमेंट पद्धतीतून टोल भरण्यासाठी वाहनावर फास्टॅग लावणे 1 जानेवारी 2020 पासून बंधनकारक करण्यात आल्याची माहिती माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच दिली. गेल्या वर्षीही ही योजना लागू करण्यावर सरकारने जोर दिला होता आणि तेव्हाच 2020 पर्यंत मुदतवाढ दिली होती. NHAI ने याआधी देखील अशी माहिती दिली होती की 1 जानेवारीपासून टोल कलेक्शन रोखीमध्ये पूर्णपणे बंद होईल. 100 टक्के टोल कलेक्शन फास्टॅगच्या माध्यमातून सरकार वसूल करू इच्छित आहे.

याबाबत इकॉनॉमिक टाइम्सने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार आणखी महिनाभर फास्टॅग लावण्याची डेडलाइन वाढू शकते. अनेक वाहनचालक आतापर्यंत रोखीमध्ये टोल देत आहेत. फास्टॅगच्या माध्यमातून सध्या होणारे टोल कलेक्शन 75 ते 78 टक्क्यांच्या दरम्यान आहे. टोलनाक्यांवरील रोखीचे व्यवहार बंद करण्यासाठी सरकारने फास्टॅगसाठी वेगळी लाइन देखील बनवली आहे. एखादी व्यक्ती अशावेळी फास्टॅगच्या रांगेत आला तर त्याला नेहमीच्या टोलपेक्षा दुप्पट पेमेंट करावे लागते.

फास्टॅगची सुविधा पूर्णपणे लागू करण्यासाठी सरकार रोख घेण्याचे व्यवहार कमी करण्यावर काम करत आहे. सरकारची अशी अपेक्षा आहे की, मोटर वाहन कायद्याच्या अनिवार्य प्रावधानांतर्गत टोल देण्यासाठी डिडिजल पेमेंट मोडमध्ये जावे लागेल. नियमांचे पालन न केल्यास दंड भरावा लागेल. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रोख टान्झॅक्शन देखील एक कायदेशीर पद्धत आहे. रोख रक्कम देण्यापासून कुणाला थांबवता येणार नसल्यामुळे मोटार वाहन कायदा कठोरपणे लागू करणेच योग्य पर्याय ठरेल. ज्यामुळे वैध असणारा फास्टॅग लागू करणे अनिवार्य होईल. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून फास्टॅग वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.