रिलायन्स जिओची 1 जानेवारीपासून पुन्हा एकदा विनामूल्य कॉलिंग सेवा


नवी दिल्ली : नवा संकल्प आणि नवी सुरुवात घेऊन येणारे नवीन वर्ष असते. त्याचनुसार वोडाफोन-आयडिया आणि एअरटेलसोबत स्पर्धेत अग्रस्थानी असलेल्या जिओने नव्या वर्षात आपल्या ग्राहकांना खास सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी रिलायन्स जिओ नव्या वर्षात एक सेवा सुरू करत आहे.

1 जानेवारीपासून पुन्हा एकदा कॉलिंग सेवा रिलायन्स जिओने विनामूल्य केली आहे. जिओचे सब्स्क्रिप्शन ज्या ग्राहकांनी घेतले आहे, अशा ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. जिओने IUC पूर्णपणे बंद केली होता, पण आता 1 जानेवारीपासून पुन्हा एकदा विनामूल्य कॉलिंग करता येणार आहे.

IUC अंतर्गत जिओवरुन इतर नेटवर्कमध्ये कॉल करण्यासाठी जिओ 14 पैसे आकारत होती, तर नंतर 7 पैसे आकारले जात होते. हा चार्ज आता हटवण्यात आला असून 1 जानेवारीपासून विनाशुल्क कॉलिंग करता येणार आहे. गुरुवारी याबाबतची माहिती रिलायन्स जिओने दिली आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की पूर्णपणे जिओ ते जिओ याशिवाय इतर नेटवर्कसाठी देखील ऑफनेट कॉल विनाशुल्क करता येणार आहेत. IUC शुल्क संपल्यानंतर जिओ ते जिओ आणि जिओ ते इतर नेटवर्कसाठी देखील ऑफनेट (डोमेस्टिक वॉइस) कॉल मोफत करता येणार आहेत. 1 जानेवारी 2021 पासून सर्व कॉल पुन्हा विनामूल्य केले जाणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.