नवी दिल्ली – 31 डिसेंबर आयकर परतावा भरण्यास शेवटची तारीख असल्यामुळे सर्व्हरवर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे आयकर परताव्याला मुदतवाढ द्यावी अशी मागणी केंद्र सरकारकडे होत होती. त्यानुसार या मागणीला केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. 12 दिवसांची मुदत केंद्र सरकारने वाढवून दिली असून 10 जानेवारीपर्यंत ही मुदत देण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्रालयाने केली आहे.
आयकर परताव्याबाबत मोदी सरकारने केली मोठी घोषणा
ज्यांच्या खात्यांचे ऑडिट शिल्लक आहे त्यांना आणि त्यांच्या पार्टनरसाठी 2020-21 चा आयकर भरण्यासाठी 15 फेब्रुवारीची नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. त्यासोबतच जीएसटी भरण्यासही 28 फेब्रुवारीपर्यंच मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, 31 जुलैपर्यंत आयकर विवरण सादर करण्याची मुदत असते. पण यंदा कोरानाच्या पार्श्वभूमीवर दोनवेळा ही मुदत वाढवून देण्यात आली होती. यामध्ये 31 जुलैनंतर 30 नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती. त्यात आणखी एक महिन्याची वाढ करून 31 डिसेंबरपर्यंत वाढ करून देण्यात आली होती.