आगामी वर्षात या दिवशी होणार तळीरामांची पंचाईत


तुम्ही जर मद्यप्रेमी असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आगामी वर्षात जवळपास प्रत्येक महिन्यात ‘ड्राय डे’ येत आहेत. मद्यविक्रीबाबतच्या कायद्यानुसार (Alcohol Laws in India) ‘ड्राय डे’ असेल तर त्या संपूर्ण दिवसभरात कोठेही मद्य मिळत नाही, याची माहिती आपल्याला आहेच. मग ते ठिकाण बिअर बार, पब्ज, देशी दारुचे दुकान असो अथवा इतर कोणतेही. तुम्हाला मद्य काही मिळणार नाही. त्यामुळे याला पर्याय एकच एक तर त्या दिवशी मद्य सेवन न करणे किंवा त्या दिवसासाठी आवश्यक मद्याची तजवीज अगोदरच करुन ठेवणे. या वर्षात कोणत्या महिन्यात कोणकोणत्या दिवशी ‘ड्राय डे’ आहेत याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत जाणून घ्या .

 • जानेवारी 2021 – जानेवारी महिन्यात 14 आणि 26 आणि 30 जानेवारी या दिवशी ड्राय डे आहे. 14 तारखेला मकर संक्राती तर 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन तर 30 जानेवारीला शहीद दिन आहे.
 • फेब्रुवारी 2021 – फेब्रुवारी महिन्यात 19 तारखेला महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती, 19 फेब्रुवारीला गुरु नानक जयंती आणि 27 फेब्रुवारीला गुरु रोहिदास जयंती निमित्त दिल्ली येथे ड्राय डे आहे.
 • मार्च 2021 – मार्च महिन्यात 8 मार्चला स्वामी दयानंद सरस्वती जयंती, 11 मार्चला महाशिवरात्री, 29 मार्च या दिवशी होळी असल्यामुळे ड्राय डे आहेत
 • एप्रिल 2021 – एप्रिल महिन्यात 2 तारखेला गुड फ्रायडे, 14 एप्रिलला आंबेडकर जयंती, 21 तारखेला राम नवमी, 25 तारखेला महावीर जयंती या दिवशी ड्राय डे आहेत.
 • मे 2021 – एक मे या दिवशी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन असतो. या दिवसासोबतच 12 मे या दिवशी ईद उल-फितरला सुरुवात आणि 13 मे या दिवशी गुरुवार ईद उल-फितर संपत आहे. त्यामुळे या दिवशी आणि 14 मे या दिवशी बासावा जयंती (कर्नाटकात) असल्याने ड्राय डे आहे.
 • जून 2021 – जून हा एकमेव महिना आहे. या महिन्यात एकही ड्राय डे नाही.
 • जुलै 2021 – जुलै महिन्यात 20 तारखेला महाराष्ट्रात आषाढी एकादशी / शायनी एकादशी असते. तसेच 24 जुलै या दिवशी असलेली गुरु पूर्णिमा यामुळे दिल्ली, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरी होते. त्यामुळे या महिन्यात दोन वेळा ड्राय डे आहेत.
 • ऑगस्ट 2021 – ऑगस्ट महिन्यात 10 ऑगस्टला मोहरम, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आणि 30 ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी असल्याने ड्राय डे आहेत.
 • सप्टेंबर 2021 – सप्टेंबर महिन्यात 10 तारखेला गणेश चतुर्थी आणि 19 तारखेला अनंत चतुर्दशी असल्यामुळे या महिन्यात दोन दिवस ड्राय डे आहेत.
 • ऑक्टोबर 2021 – 2 ऑक्टोबर- गांधी जयंती, 6 ऑक्टोबर- महालय अमावस्या, 8 ऑक्टोबर- Prohibition Week (in Maharashtra), 15 ऑक्टोबर- दसरा / विजयादशमी, 18 ऑक्टोबर- ईद-ए-मिलाद, 20 ऑक्टोबर- महर्षि वाल्मीकि जयंती या दिवशी ड्राय डे घोषित करण्यात आला आहे.
 • नोव्हेंबर 2021 – नोव्हेंबर महिन्यात 1 तारखेला कर्नाटक राज्योत्सव असल्याने कर्नाटकात ड्राय डे आहे. 4 नोव्हेंबरला दिवाळी, 14 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी / प्रबोधिनी एकादशी असल्यामुळे या दिवशी ड्राय डे आहे. 22 नोव्हेंबरला कनकदास जयंती (कर्नाटकात), 24 नोव्हेबरला गुरु तेग बहादूर यांचा शहादत दिवस असल्याने ड्राय डे आहे.
 • डिसेंबर 2021 – डिसेंबर महिना जून प्रमाणेच असून या महिन्यातही कोणत्याही प्रकारचा ड्राय डे नाही.

  दरम्यान, जवळपास 35 दिवस 2021 या संपूर्ण वर्षात ड्राय डे आहेत. यात महाराष्ट्र, कर्नाटक आणि राजधानी दिल्लीचा समावेश आहे. दरम्यान, विविध राज्यांत जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा निवडणूक आयोग आदर्श आचरसंहिता लागू होते त्यावेळीही ड्राय डे असतात. ते तत्कालीन असतात.