माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांचा भाजपमध्ये प्रवेश


तामिळनाडू : भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिरकी गोलंदाज आणि समालोचक लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी आता आपल्या राजकीय इनिंगला सुरुवात केली आहे. आज (30 डिसेंबर) त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावेळी तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष सी टी रवी उपस्थित होते.

सी टी रवी यांनी शिवरामकृष्णन यांच्या भाजप प्रवेशावर आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारणात प्रवेश न करण्याच्या निर्णयावरही प्रतिक्रिया दिली. रजनीकांत हे एक दिग्गज नेते असून त्यांचा आम्ही सर्व आदर करतो. रजनीकांत हे नेहमी तामिळनाडू आणि देशाच्या हिताची गोष्ट करतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरम्यान गेल्या काही दशकांपासून क्रिकेट आणि राजकारणाचा संबंध राहिला आहे. राजकारणात आतापर्यंत अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी प्रवेश केला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, नवज्योत सिंह सिद्धू, किर्ती आझाद, विनोद कांबळी यासारख्या क्रिकेटपटुंचा समावेश आहे.