बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का भाऊ? कंगनाचे नाव न घेता उर्मिला यांचा टोला


मुंबई – शिवसेनेसोबत झालेल्या वादानंतर अभिनेत्री कंगना राणावत पहिल्यांदाच मुंबईत परतली. केवळ बाप्पाच्याच परवानगीची मुंबईत राहण्यासाठी गरज लागते. त्याचबरोबर इतर कुणाच्या परवानगीची गरज नसल्याचे म्हणत शिवसेनेला डिवचणाऱ्या कंगनाला शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी टोला लगावला आहे. बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ, असा मिश्किल सवाल करत कंगनाचे नाव न घेता उर्मिला यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.


माझ्या प्रिय मुंबई शहराच्या पाठी उभे राहण्यासाठी असे म्हणत उर्मिला यांनी बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का भाऊ, असा सवाल ट्विटरटच्या माध्यमातून केला आहे. याआधीही कंगनावर उर्मिला यांनी हल्लाबोल केला असल्यामुळे त्यांच्या या ट्विटनंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर शाब्दिक चकमक रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान काल कंगनाने सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर तिने माध्यमांशी संवाद साधला. मुंबईत राहण्यासाठी मला केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नसल्याचे म्हणत तिने शिवसेनेला टोला लगावला होता.