शेतकरी आंदोलनादरम्यान जिओच्या १५०० मोबाइल टॉवरचे नुकसान


नवी दिल्लीः दिल्लीच्या वेशीवर केंद्र सरकारच्या तीन कृषि कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पंजाब, हरीयाणामधील शेतकरी केंद्र सरकारच्या या कायद्याला विरोध करण्यासाठी रस्त्यांवर उतरले आहेत. आता महिना शेतकरी आंदोलनाला उलटून गेला आहे. दरम्यान या आंदोलनाला हिंसक रूप मिळत आहे. रिलायन्स जिओच्या मोबाइल टॉवरचे या आंदोलना दरम्यान नुकसान करण्यात येत आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या माहितीनुसार, ३.९ कोटी मोबाइलचा वापर पंजाबमध्ये करण्यात येत असून यात रिलायन्स जिओचे दीड कोटी ग्राहक आहेत.

आंदोलनादरम्यान पंजाबमध्ये , रिलायन्स जिओचे २ हजारांच्या जवळपास मोबाइल टॉवरला नुकसान पोहोचवले गेले आहे. शेतकऱ्यांना पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आवाहन केले परंतु, त्यांच्या आवाहनाला शेतकऱ्यांनी फारसा प्रतिसाद दिलेला दिसत नाही. दीड हजारांहून जास्त मोबाइल टॉवरला गेल्या महिन्याभरात नुकसान पोहोचवले गेल्याची माहिती समोर आली आहे. या कृषि कायद्याचा विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे. रिलायन्स जिओने गेल्या काही दिवसात तोडफोडीमुळे काही टॉवरचे काम करायला सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ८२६ साइट यामुळे डाउन होती. जिओचे जवळपास ९ हजार टेलिकॉम टॉवर आहेत.