नवीन वर्षात महाग होणार टीव्ही, फ्रिजसह अन्य घरगुती सामान


नवी दिल्ली – नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यापासून एलईडी टीव्ही, फ्रिज आणि वॉशिंग मशीन सारख्या अन्य घरगुती सामानांच्या किंमतीत 10 टक्के वाढ होण्याची शक्यता असून तांबे, अॅल्युमिनिअम सारख्या कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ आणि वाहन भाडे महागल्यामुळे त्यांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच कच्च्या तेलासह प्लास्टिकच्या किंमतीत देखील वाढ होणार असून जानेवारी महिन्यापासून एलजी, पॅनासॉनिक आणि थॉमसन सारख्या कंपन्या किंमतीत वाढ करणार आहे. तर या परिस्थितीचा सोनी कंपनी संदर्भात आढावा घेत असून लवकरच निर्णय जाहीर करणार आहे.

याबाबत माहिती देताना पॅनासॉनिक इंडियाचे अध्यक्ष आणि सीईओ मनीष शर्मा यांनी असे म्हटले की, भविष्यात होणाऱ्या ज्या किंमतीत वाढ होईल त्याचा परिणाम आमच्या किंमतीवर ही होणार आहे. जानेवारीत 6-7 टक्के किंमतीत वाढ आणि आर्थिक वर्षाच्या तिमाहित 10-11 टक्के वाढू शकतात असा अंदाज आहे.

पुढील वर्षात जानेवारीपासून एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया सुद्धा किंमतीत 7-8 टक्के वाढ करणार आहे. एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे उपाध्यक्ष विजय बाबू यांनी म्हटले की, आम्ही जानेवारी महिन्यापासून टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स मशीन, फ्रीज सारख्या गोष्टींच्या किंमतीत वाढ करणार आहोत. कच्च्या मालाच्या किंमतीत वेगाने वाढ झाली आहे. त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या किंमती ही वाढल्या आहेत. याच कारणास्तव प्लास्टिकच्या वस्तूंच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. परंतु सोनी इंडियाच्या किंमती वाढवण्याबद्दल आढावा घेतला जात आहे. याबद्दल अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. याबद्दस सोनी इंडियाचे प्रबंध निर्देशक सुनील नय्यर यांनी म्हटले की, सध्या नाही. अद्याप वाट पाहिली जात असून परिस्थितीचा आढावा घेत आहोत.