हिंदू महिला आणि मुस्लीम पुरुषांमधील अश्लील सेक्स स्टोरीजमुळे अ‍ॅमेझॉन पुन्हा वादात


नवी दिल्ली – देशभरामध्ये लव्ह जिहादवरुन जोरदार चर्चा सुरु असतानाच अ‍ॅमेझॉन या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आता धर्माच्या आधारावर अश्लील साहित्य उपलब्ध असल्याची माहिती समोर येत आहे. मुस्लीम पुरुष आणि हिंदू स्त्रियांमधील संबंधांवर अश्लील पद्धतीने भाष्य करणारी अनेक पुस्तके अ‍ॅमेझॉनच्या किंडल एडिशनवर उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे.

‘इंडियन हिंदू वाईफ्स अफेर विथ हर मुस्लीम लव्हर’ हे त्यापैकीच एक पुस्तक आहे. किंडलच्या अनलिमिटेड स्बस्क्रीप्शनमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे. निलिमा स्टीव्हन्स या पुस्तकाची लेखिका आहे. मुस्लीम पुरुष आणि टिकली लावलेली हिंदू महिला ३५ पानांच्या या पुस्तकाच्या कव्हरवर दाखवण्यात आली आहे. लग्न झालेली हिंदू महिला श्वेता आणि तिची मुस्लीम मैत्रिण रझीया हिचा पती अशरफ यांच्यामधील लैंगिक संबंधांबद्दल या पुस्तकामध्ये अगदी अश्लील भाषेत वर्णन करण्यात आले आहे. अश्लील वर्णनाबरोबरच या पुस्तकामध्ये शाकाहारी असणारी हिंदू श्वेता ही अशरफमुळे मांसांहार करु लागल्याचे सांगण्यात आले आहे. किंडलवर २० हून अधिक अशाच प्रकारची पुस्तके याच लेखिकेची आहेत. त्याचबरोबर ‘इंडियन वाइफ चिटिंग : सेक्स विथ नेबर’ असेच एक पुस्तक आहे. अय्यर कुटुंबतील महिला आणि तिच्या शेजारी राहणाऱ्या मुरर्शिद शेख यांच्यामधील संबंधांबद्दल या पुस्तकामध्ये भाष्य करण्यात आले आहे. मद्रासी देहविक्री करणारी, हिंदू वेश्या अशा आक्षेपार्ह शब्दांचाही वापर या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे.

हिंदू महिला आणि मुस्लीम व्यक्तीमधील संबंधांचे अगदी अश्लील वर्णन ‘चिटिंग वाइफ्स अफेर विथ हसबण्ड्स फ्रेण्ड’ या पुस्तकामध्येही करण्यात आले आहे. विशेष म्हणजे निलिमा स्टीव्हन्सचेच हे पुस्तकही आहे. अशाप्रकारे अ‍ॅमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवर हिंदू महिला आणि मुस्लीम पुरुषांमधील संबंधांबद्दल भाष्य करणारे बरेच अश्लील साहित्य या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असल्याचे स्वराजमाग डॉट कॉमने म्हटलं आहे.

अ‍ॅमेझॉनच्या किंडल एडिशनवर सुनिता सारन या नावाच्या लेखिकेचीही अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. एक दाढी असणारा पुरुष आणि दोन महिला या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दिसत आहेत. एका महिलेने साडी नेसलेली असून दुसरी अंगावर चादर ओढून बसलेली दिसत आहे. या महिलांना धमकावून हा डॉन त्यांच्यावर बलात्कार करतो आणि त्याचे व्हिडीओ बनवून दाखवण्याची धमकी देतो अशी कथा या पुस्तकात आहे. डॉनची या महिलांना भिती वाटत असली, तरी त्यांना यामध्ये सुख मिळत असल्याचे वर्णनही या पुस्तकात आहे. अशाप्रकारे प्रविश सिंग नावाच्या लेखकाचे ‘हिंदू वाईफ सेक्सी एन्काऊन्टर विथ मुस्लीम ड्रायव्हर’ या नावानेही अ‍ॅमेझॉनच्या किंडल एडिशनवर पुस्तक उपलब्ध आहे.

थेट पुस्तके प्रकाशित करण्याची अ‍ॅमेझॉन किंडलवर सोय उपलब्ध आहे. या सेवेमुळे एक अकाऊंट बनवल्यानंतर पुस्तके प्रकाशित करता येतात. काही पैसे यासाठी मोजावे लागता. अनेकदा खोट्या नावाने नवीन लेखक अकाऊंट सुरु करुन अशी पुस्तके प्रकाशित करतात. अ‍ॅमेझॉनने या सेवेमध्ये काही विशिष्ट घटकातील लोकांच्या भावना दुखावणारा मजकूर प्रकाशित करता येणार नसल्याचे नियमांमध्ये म्हटले आहे. अशी पुस्तके आढळून आल्यास वाचकांना त्यासंदर्भात रिपोर्टही करता येतो. या पुस्तकांना ‘ऑफेन्सिव्ह अ‍ॅण्ड क्रॉन्ट्राव्हर्शियल मटेरियल’ असे मार्क करुन रिपोर्ट करता येते. पण अनेक नियम असले तरी ही पुस्तके उपलब्ध असल्याचे किंडलवर सर्च केल्यावर लगेच दिसून येते.