विराट कोहली दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू


नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दशकाचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे. या दशकात तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यात कोहलीच्या दमदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने त्याला सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार म्हणजेच ‘सर्वश्रेष्ठ क्रिकेटर ऑफ द दशक’ने गौरव केला आहे.


कोहली आयसीसी पुरस्कारांच्या या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने या काळात यासह सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक अर्धशतकाही झळकावली आहेत. या दशकात कोहलीने फलंदाजीमध्ये 20,396 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 66 शतके आणि 94 अर्धशतकांचा समावेश होता.

आयसीसीने यापूर्वी कोहलीची दशकातील सर्वश्रेष्ठ एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून निवड केली होती. या दशकात, कोहली एकदिवसीय क्रिकेटमधील एकमेव खेळाडू आहे, ज्याने 10,000 हून अधिक धावा केल्या आहेत. तर रविवारी आयसीसीने विराट कोहलीला या दशकाच्या तिन्ही फॉर्मेटच्या संघात स्थान दिले. त्याशिवाय आयसीसीने कोहलीला या दशकातील कसोटी संघाचा कर्णधारही बनवले.