आज आणि उद्या चार राज्यात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम


नवी दिल्ली : देशाच्या कानाकोपऱ्यात कोरोना लस पोहोचण्याची तयारी आजपासून सुरु होणार आहे. कोरोना लसीकरणाच्या तयारीच्या आढावा घेण्यासाठी पंजाब, आसम, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये दोन दिवसांचा ड्राय रन करण्यात येणार आहे. ड्राय रन या चार राज्यांच्या पाच ठिकाणी केले जाणार आहे. या ड्राय रनचा लसीकरणाआधी सर्व तयारीचा आढावा घेणे किंवा त्रुटी असतील तर त्या दूर करणे त्याचबरोबर प्लॅनिंग, इम्प्लिमेन्टेशन किंवा रिपोर्टिंग मेकॅनिजम पाहण आणि त्यात सुधारणा करणे हा देखील उद्देश आहे. कोरोना लसीसाठी ड्राय रनमध्ये कोल्ड स्टोअरेज आणि वाहतुकीची व्यवस्था, परीक्षण स्थळांवर गर्दीची व्यवस्था, सोशल डिस्टन्स यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.

यावेळी लस देण्यासाठी प्रामुख्याने तयार केलेले Co-WIN अॅपची ऑपरेशनल फीसिबिलिटी, फील्ड प्लॅनिंग आणि इम्प्लिमेन्टेशन तपासले जाईल. ही एक रंगीत तालीम असेल. जे लसीकरणाच्या वेळी केले जाते ते सगळे यावेळी केले जाईल, पण लस मात्र दिली जाणार नाही.

लसीकरणासाठी लागणारी पूर्वतयारी आज पहिल्या दिवशी केली जाईल. यासाठी वेगवेगळे सेशन्स घेतले जातील. यात Co-Win अॅपवरील नोंदणी, लसीकरण मोहिम राबवणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदारीचे वाटप, ब्लॉक स्तरावरील लस वाहतुकीच्या साधनांची तयारी अशा बाबींचा समावेश असेल. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या प्रत्यक्ष लसीकरण कसे केले जाईल याची रंगीत तालीम घेतली जाईल.

चारही राज्यांत मिळून या ड्राय रनमध्ये एकूण 125 आरोग्य सेवक लसीकणाचे लाभार्थी म्हणून सहभाही होणार आहेत. ही ड्राय रन नोंदणी, मायक्रोप्लॅनिंग आणि प्रत्यक्ष लसीकरणाचे ड्राय रन या तीन टप्प्यांमध्ये होईल. केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सआधारे या ड्राय रनमध्ये राज्य आणि जिल्हा टास्क फोर्स सहभागी होतील. चार राज्यांतील ड्राय रन जिल्हा हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज इथे राबवली जाईल.

असे असेल ड्राय रन

  • प्लॅनिंग आणि तयारी करणे
  • Co Win अॅपची टेस्टिंग करुन आलेला हेल्थ केअर वर्करची माहिती अपलोड करणे
  • सेशन प्लॅनिंग आणि वॅक्सिनेटर डिप्लॉयमेंट.
  • लसीकरण साईटवर लस आणणे आणि लॉजिस्टिक तपासणे. ते Co Win अॅपद्वारे देणे
  • सेशन साईटवर लसीकरण करणं आणि अहवाल तयार करणे
  • यानंतर ब्लॉक, जिल्हा आणि राज्याला आढावा बैठक घेऊन अभिप्राय द्यावा लागेल. जर त्रुटी असतील तर त्याची नोंद करणे.
  • ड्राय रनसाठी वॅक्सिनेटरसाठी (ANM) Co-WIN ची (www.Uat.co-vin.in) आणि (www.app.uat.co-vin.in) परीक्षण लिंक तयार ठेवली जाईल.

पाच सत्र असलेल्या ठिकाणी प्रत्येक ड्राय रनसाठी 25 आरोग्य सेवकांची लाभार्थी म्हणून करण्यात आली आहे. ड्राय रन सेशन साईटवर आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती साईटवर असेल. यावेळी Co-WIN अॅपद्वारे एसएमएसचीही तपासणी होईल, ज्यात पुढील लसीकरणाची माहिती असेल. लाभार्थ्यांसह (आरोग्यसेवक) सेशन फ्लोचं आकलन होईल. या दरम्यान कोणतीही लस दिली जाणार नाही. परंतु लसीकरणाच्या वेळी जी प्रक्रिया पार पाडली जाते तशीच प्रक्रिया पाडली जाईल.

दोन तासात या साईटवर सर्वात आधी 25 डमी आरोग्य कर्मचारी येतील. यानंतर लसीकरण अधिकारी लाभार्थ्यांच्या नावाची यादी तपासेल. दुसरा अधिकारी ही नावे Co-WIN अॅपद्वारे पडताळणी करेल. यानंतर लसीकरण अधिकारी Co-Win अॅपवर लसीकरणाची माहिती भरेल.

गर्दीच्या नियंत्रणाचे काम तिसरा आणि चौथा लसीकरम अधिकारी हा करेल, IPC (इंटर प्रोसेस कम्युनिकेशन) मेसेजिंग, वॅक्सिनेटरचं समर्थन करेल. लसीकरणानंतर लाभार्थी 30 मिनिटांची प्रतीक्षा करतील. यादरम्यान दोन किंवा तीन adverse effect following immunization म्हणजेच लस लागल्यानंतर जर कोणताही दुष्परिणामाची घटना घडली तर त्याची सेशन साईटवरुन Co-Win अॅप माहिती दिली जाईल.