केंद्र सरकार 30 डिसेंबर रोजी करणार शेतकरी संघटनांशी चर्चा


नवी दिल्ली – शेतकरी आणि सरकारमधील कृषी कायद्याच्या मुद्यावरून सुरू असलेला वाद आता चर्चेच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. केंद्र सरकारची 30 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता शेतकरी संघटनांशी चर्चा होऊ शकते. या संदर्भात केंद्रीय कृषी सचिव संजय अग्रवाल यांनी शेतकरी संघटनांना पत्र पाठवले आहे.

केंद्र सरकराने पाठवलेल्या पत्राच्या आधी शेतकरी संघटनांनी सरकारशी चर्चेसाठी 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता बैठकीचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावात शेतकरी नेत्यांनी त्यांच्या वतीने बैठिकाचा अजेंडा देखील केंद्र सरकारला पाठविला होता.

यात तीनही कृषी कायदे रद्द करणे आणि किमान आधारभूत किंमतीच्या (एमएसपी) हमी या मुद्द्यांवर सरकारबरोबर चर्चेचा अजेंडा असावा, असे शेतकरी संघटनांनी प्रस्तावात म्हटले होते. याआधीही सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये अनेकवेळा चर्चा झाली आहे. मात्र या चर्चा निष्फळ ठरल्या होत्या.