आज ‘ऑस्कर’ विजेता गायक-संगीतकार ए.आर.रहमान यांच्या आईचे निधन झाले आहे. ही बातमी खुद्द रहमान यांनीच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी शेअर केली आहे. आपल्या आईचा फोटो सोशल मीडियावर त्यांनी शेअर केला आहे. गेल्या काही काळापासून ए.आर. रहमान यांची आई करीमा बेगम आजारी होत्या. ए.आर. रहमान यांची आई करीमा बेगम गेल्या काही काळापासून आजारी होत्या. रहमान त्यांच्या आईच्या खूप जवळ होते. त्यामुळे आई गेल्यानंतर रहमान यांना शोक अनावर झाला होता.
संगीतकार ए.आर. रहमान यांच्या आईचे निधन
रहमान प्रत्येक खास प्रसंगी आपल्या आईचा उल्लेख करत. आपल्या आईनेच आपल्यातील संगीत आणि आपले कलागुण ओळखले, असे रहमान नेहमी म्हणत. स्वतःच्या संपूर्ण यशाचे श्रेय त्यांनी करीमा बेगम यांना दिले होते. ए.आर. रहमान यांनी एका मुलाखती दरम्यान आपल्या आईविषयी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. आमचे नाते चित्रपटात दाखवतात तसे नव्हते. आम्ही कधी एकमेकांची गळाभेट घ्यायचो नाही. तरीही तिचे माझ्यावर खूप प्रेम होते. मझ्यासाठी काय योग्य हे तिलाच जास्ती ठावूक असल्याचे ए.आर.रहमान म्हणाले.