अभिनेते रणजित यांचे डिजिटल विश्वात पदार्पण!


अभिनेते रणजित यांनी डिजिटलमध्ये पदार्पण केले आहे. पण, रंजीत हे यावेळी खलनायक बनून कोणालाही घाबरवायला किंवा धमकावणार नाही, तर ते त्यांच्या विनोदाने सर्वांना हसवणार आहेत. त्यांनी ‘बेचारे’ वेब सीरीजच्या माध्यमातून डिजिटलमध्ये पदार्पण केले आहे. या वेब सीरीजचा पहिला भाग 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला असून आता दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे.

चार तरुण मुलांची आणि एक मुलींची कहाणी बेचारे वेब सीरीजमध्ये आहे जे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन साधण्याच्या प्रयत्न करतात पण, हे करत असताना त्यांना अनेक अडचणी येतात. रणजित यांच्यासोबतच या वेब सीरीजमध्ये अमित यादव, संदीप श्रीवास्तव, संभव जैन, हिमांशू भट्ट, प्रकाश चौधरी आणि मयुरी महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत.

आपल्या डिजिटल पदार्पणाबद्दल रणजीत म्हणाले की, मला एपिसोडिक वेब सीरीजमध्ये काम करण्याची इच्छा होती. पण या वेब सीरीजमध्ये मला यंग जनरेशनबरोबर काम करण्याची संधी मिळाली. यांच्यासोबत काम करताना मला एक वेगळा अनुभव मिळाला आहे. क्रांती प्रताप सिंह यांनी दिग्दर्शित आणि राहुल दत्ता यांनी बेचारे वेब सीरीजची निर्मिती केली आहे. या वेब सीरीजबद्दल राहुल दत्ता म्हणाले की, ही वेब सीरीज तरुणांवर आधारित आहे.