संशोधनात समोर आली धक्कादायक बाब; दारूचा एकच प्याला करेल तुमचा घात


वॉशिंग्टन : अनेक लोक दारू पिऊन गाडी चालवतात. आपण शुद्धीत असल्याचे आणि आपल्यावर ताबा असल्याचे त्यांना वाटते. पण अतिशय कमी प्रमाणात जरी तुम्ही दारुचे सेवन केले असेल तरीही तुमच्या अनेक कामांत अडथळा येतो. याचा प्रभाव तुमच्या ड्रायव्हिंग आणि इतर गोष्टींवर पडतो. एक किंवा दोन ग्लास अल्कोहोल प्यायल्यानंतर तुमच्या हाताचे आणि डोळ्यांचे संतुलन बिघडत असल्याचे संशोधनाद्वारे समोर आले आहे.

हे संशोधन कॅलिफोर्नियामधील नासाच्या अ‍ॅम्स रिसर्च सेंटरमधील संशोधक पथकाच्या अभ्यास पथकाने केला असून एक किंवा दोन ग्लास अल्कोहोल पिल्यानंतर तुमच्या हाताचे आणि डोळ्यांचे संतुलन बिघडत असल्याचे संशोधनात समोर आले. या संशोधनासाठी आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा ड्रिंक करणाऱ्या 20 वर्षीय मुली आणि मुलांची निवड करण्यात आली होती. सहभागी मुलांनी रात्री उत्तम झोप घेतली आहे की नाही हे सुरुवातीला तपासण्यात आले. त्याचबरोबर प्रयोगाच्या आदल्या रात्री त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अल्कोहोलचे आणि कॅफिनचे सेवन केले नसल्याचे देखील तपासण्यात आले होते.

त्यानंतर त्यांच्या डोळ्यांची हालचाल, बुबुळांची हालचाल आणि रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण यांचे निरीक्षण केले. यामध्ये अल्कोहोलचे सेवन केल्यानंतर आणि सेवन करण्याआधी त्यांचे काम करताना निरीक्षण करण्यात आले. त्यांच्या रक्तात विविध प्रमाणात अल्कोहोलची पातळी होऊ शकणारे मिक्स ड्रिंक यामध्ये देण्यात आल्यामुळं आपण नक्की किती अल्कोहोल घेतल्याची कल्पना त्यांना नव्हती.

संशोधकांनी त्यानंतर 21 वेगवेगळ्या डोळ्यातील निरीक्षणं नोंदवली. ही मानके मेंदूच्या विशिष्ट भागातील न्यूरल प्रोसेसिंगचे मूल्यांकन करण्यासाठी वापरली जातात. अर्धी बिअर प्यायल्यानंतरदेखील 75 किलो वजनाची व्यक्ती तिच्या हाताचा आणि डोळ्यांचा समन्वय बिघडतो. यामुळे ड्रायव्हिंग करणे, पायलटिंग आणि जड वस्तूंवर काम करण्याच्या तुमच्या क्षमेतवर प्रभाव पडत असल्याचे संशोधनात दिसले. यापूर्वी करण्यात आलेल्या संशोधनात अल्कोहोलचा blood alcohol concentrations वर प्रभाव पडत असल्याने ड्रायव्हिंग करणे सोपे जात होते. पण नवीन संशोधनानुसार याचा परिणाम हातावर आणि डोळ्यांवर देखील होत असल्याने ड्रायव्हिंग करण्यास अडचणी येऊ शकतात.

द जर्नल ऑफ फिजियोलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या पेपरच्या लेखिका टेरेंस टायसन यांनी या संशोधनाविषयी माहिती देताना म्हटले, लोकांना एक ग्लास अल्कोहोल घेतल्यानंतर ते स्थिर असल्याचे वाटते, पण त्यात तथ्य नसून नक्कीच त्यांच्यावर त्याचा परिणाम झालेला असतो. आपण शुद्धीत असल्याचे आणि आपल्यावर ताबा असल्याचे आपल्याला वाटते. पण याचा नक्कीच प्रभाव होत असल्याचे देखील टायसन यांनी म्हटले. दरम्यान, या संशोधनात ही नवीन गोष्ट समोर आल्यानंतर आता डोळ्यांच्या परिस्तिथीचा विकृतीजन्य रोग यांसारख्या न्यूरॉलॉजिकल आजारांवर कसा परिणाम होतो याचाही संशोधक अभ्यास करणार आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही